T20 World Cup 2021: आकाश चोप्राने समजावले उपांत्य फेरीचे गणित, न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याने अशी टीम इंडियाची होईल बल्ले-बल्ले

सलामीच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी झाला. यामध्ये विराट ब्रिगेडला 10 विकेटने मोठा पराभव पत्करावा लागला. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने सेमीफायनलसाठी पाकिस्तानच्या विजयाचा टीम इंडियाला कसा फायदा होईल हे सांगितले आहे.

आकाश चोपडा (Photo Credit: Instagram)

विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियासाठी (Team India) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 ची सुरुवात अपेक्षेनुसार झाली नाही. सलामीच्या सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan) झाला. यामध्ये विराट ब्रिगेडला 10 विकेटने मोठा पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध दुसऱ्या सामन्यातून मैदानात उतरणार आहे, पण त्यापूर्वी किवी संघ आज रात्री पाकिस्तानशी भिडणार आहे. या सामन्यात भारतीय चाहते त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी देशाकडून मागील सामन्यात वाईटरित्या पराभूत झाले असतानाही त्यांच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसतील. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) टीम इंडिया सेमीफायनलमध्ये आपली जागा कशी बनवू शकते आणि पाकिस्तानच्या विजयाचा टीम इंडियाला कसा फायदा होईल हे सांगितले आहे. (T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून भारताने ‘हे’ धडे घेतले पाहिजेत, माजी दिग्गज फलंदाजाचा ‘विराट ब्रिगेड’ला सल्ला)

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश म्हणाले, “मला वाटते की पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवले तर भारताला मदत होईल. पण जर उलटफेर झाला, न्यूझीलंडने पाकिस्तानला हरवले, तर ती तिरंगी लढत पाहायला मिळेल आणि नेट रनरेटने निर्णय तेव्हा होईल जर भारताने न्यूझीलंडला पराभूत केले आणि तिन्ही संघ त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकतील. जर पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवले तर अफगाणिस्तान मध्यभागी असेल आणि स्कॉटलंड व नामिबियाचे संघ जे क्वालिफायरमधून आले आहेत. त्यानंतर पाकिस्तानकडून उपांत्य फेरीत प्रवेश करेल आणि आनंद घ्या,” त्यांनी पुढे स्पष्ट केले. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड ही स्पर्धा देखील एक अशी स्पर्धा आहे जी मेन इन ग्रीनसाठी अधिक महत्वपूर्ण असेल. सुरक्षेच्या कारणास्तव किवींनी अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती. न्यूझीलंडने मोक्याच्या क्षणी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने बाबर आजम संघाची खूपच निराशा झाली.

सध्या, शून्य गुण आणि -0.973 च्या नेट रन रेटसह भारत पॉइंट टेबलमध्ये 5 व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान सध्या +6.500 च्या NRR सह गट 2 मध्ये अव्वल स्थानावर आहे. तर पाकिस्तान +0.973 NRR सह दुसऱ्या स्थानावर आहे.