SA20 League 2025 Full Schedule And Squad: गुरुवारपासून दक्षिण आफ्रिकेत रंगणार टी-20 चा थरार, SA20 स्पर्धेचे 6 संघ, लाइव्ह स्ट्रीमिंगसह संपूर्ण वेळापत्रक घ्या जाणून

SA T20 (Photo @SA20_League)

SA20 League 2025 Full Schedule: दक्षिण आफ्रिकेची टी-20 लीग SA20 उद्यापासून म्हणजेच 9 जानेवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 8 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. ही लीग 2023 मध्ये सुरू झाली होती आणि तेव्हापासून तिचे दोन हंगाम पूर्ण झाले आहेत आणि दोन्ही वेळा एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स इस्टर्न केप संघाने विजेतेपद पटकावले आहे. या मोसमात एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघांमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे. (हे देखील वाचा: ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानातील स्टेडियम अद्याप तयार नाही, यजमानपद हिसकावून घेण्याची शक्यता?)

अंतिम सामना 8 फेब्रुवारीला होणार 

आगामी हंगामात एकूण 34 सामने खेळवले जाणार आहेत. या लीग टप्प्यातील पहिला सामना 9 जानेवारी रोजी सनरायझर्स इस्टर्न केप आणि एमआय केपटाऊन यांच्यात होणार आहे. लीग टप्प्यातील शेवटचा सामना 2 फेब्रुवारीला खेळवला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना 8 फेब्रुवारी रोजी जोहान्सबर्ग येथील वांडरर्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. सनरायझर्स इस्टर्न केप संघाची नजर पुन्हा एकदा विजेतेपदावर असेल.

सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध एमआय केपटाऊनमध्ये होणार पहिला सामना

या स्पर्धेतील पहिला सामना सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध एमआय केपटाऊन यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजल्यापासून गेबरहा येथील सेंट जॉर्ज ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. या स्पर्धेत सनरायझर्स इस्टर्न केपची कमान एडन मार्करामच्या हाती आहे. तर, एमआय केपटाऊनचे नेतृत्व राशिद खान करत आहे.

तारीख सामना वेळ
9 जानेवारी सनरायझर्स ईस्टर्न केप विरुद्ध एमआय केप टाउन रात्री 9 वाजता
10 जानेवारी डर्बन सुपर जायंट्स विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स रात्री 9 वाजता
11 जानेवारी पार्ल रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स इस्टर्न केप संध्याकाळी 4:30 वाजता
जॉबर्ग सुपर किंग्स विरुद्ध एमआय केप टाउन रात्री 9 वाजता
12 जानेवारी प्रिटोरिया कॅपिटल्स विरुद्ध डर्बन सुपर जायंट्स रात्री 7 वाजता
13 जानेवारी एमआय केप टाउन विरुद्ध पार्ल रॉयल्स रात्री 9 वाजता
14 जानेवारी प्रिटोरिया कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स इस्टर्न केप संध्याकाळी 7.30 वाजता
डर्बन सुपर जायंट्स विरुद्ध जॉबर्ग सुपर किंग्स रात्री 9 वाजता
15 जानेवारी पार्ल रॉयल्स वि एमआय केप टाउन रात्री 9 वाजता
16 जानेवारी जॉबर्ग सुपर किंग्स विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स रात्री 9 वाजता
17 जानेवारी डर्बन सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स इस्टर्न केप रात्री 9 वाजता
18 जानेवारी प्रिटोरिया कॅपिटल्स विरुद्ध पार्ल रॉयल्स संध्याकाली 4.30 वाजता
एमआय केप टाउन विरुद्ध जॉबर्ग सुपर किंग्ज रात्री 9 वाजता
19 जानेवारी एमआय केप टाउन विरुद्ध जॉबर्ग सुपर किंग्ज रात्री 9 वाजता
20 जानेवारी पार्ल रॉयल्स विरुद्ध जॉबर्ग सुपर किंग्स रात्री 9 वाजता
21 जानेवारी डर्बन सुपर जायंट्स विरुद्ध एमआय केप टाउन रात्री 9 वाजता
22 जानेवारी सनरायझर्स ईस्टर्न केप विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स रात्री 9 वाजता
23 जानेवारी डर्बन सुपर जायंट्स विरुद्ध पार्ल रॉयल्स रात्री 9 वाजता
24 जानेवारी सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध जॉबर्ग सुपर किंग्स रात्री 9 वाजता
25 जानेवारी पार्ल रॉयल्स विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स संध्याकाळी 4.30 वाजता
एमआय केप टाउन विरुद्ध डर्बन सुपर जायंट्स रात्री 9 वाजता
26 जानेवारी जॉबर्ग सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स इस्टर्न केप संध्याकाळी 7 वाजता
27 जानेवारी पार्ल रॉयल्स विरुद्ध डर्बन सुपर जायंट्स रात्री 9 वाजता
28 जानेवारी प्रिटोरिया कॅपिटल्स विरुद्ध जॉबर्ग सुपर किंग्ज रात्री 9 वाजता
29 जानेवारी एमआय केप टाउन विरुद्ध सनरायझर्स इस्टर्न केप रात्री 9 वाजता
30 जानेवारी जॉबर्ग सुपर किंग्स विरुद्ध पार्ल रॉयल्स रात्री 9 वाजता
31 जानेवारी प्रिटोरिया कॅपिटल्स विरुद्ध एमआय केप टाउन रात्री 9 वाजता
1 फ्रेबुवारी सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध पार्ल रॉयल्स संध्याकाळी 4.30 वाजता
जॉबर्ग सुपर किंग्स विरुद्ध डर्बन सुपर जायंट्स रात्री 9 वाजता
2 फ्रेबुवारी एमआय केप टाउन विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स संध्याकाळी 7 वाजता

                                             प्लेऑफ और फाइनल का कार्यक्रम

तारीख सामना वेळ
4 फ्रेबुवारी पात्रता फेरी 1 रात्री 9 वाजता
5 फ्रेबुवारी एलिमिनेटर रात्री 9 वाजता
6 फ्रेबुवारी पात्रता 2 रात्री 9 वाजता
8 फ्रेबुवारी अंतिम सामना रात्री 9 वाजता

भारतातील कुठे घेणार स्पर्धेचा आनंद

या हंगामातील सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार ॲप डाउनलोड करावे लागेल. जेथे चाहते SA20 सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.

या हंगामासाठी सर्व संघांचे खेळाडू

डरबन सुपर जायंट्स: ब्रँडन किंग, क्विंटन डी कॉक, नवीन-उल-हक, केन विल्यमसन, ख्रिस वोक्स, प्रेनलन सुब्रायन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज (कर्णधार), नूर अहमद, हेनरिक क्लासेन, जॉन-जॉन स्मट्स, विआन मुल्डर, जूनियर डाला, ब्राइस पार्सन्स, मॅथ्यू ब्रिट्झके, जेसन स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, शामर जोसेफ, सीजे राजा.

जॉबर्ग सुपर किंग्स: फाफ डु प्लेसिस (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, महेश तिखिना, डेव्हॉन कॉनवे, जेराल्ड कोएत्झी, डेव्हिड विसे, लुईस डू प्लॉय, लिझाद विल्यम्स, नांद्रे बर्गर, डोनोव्हन फरेरा, इम्रान ताहिर, सिबोनेलो मखान्या, तबरेझ शम्सी , विहान लुब्बे, इव्हान जोन्स, डग ब्रेसवेल, जेपी किंग.

एमआय केपटाऊन: रशीद खान (कर्णधार), बेन स्टोक्स, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, अजमातुल्ला उमझाई, डेवाल्ड ब्रेव्हिस, रायन रिकेल्टन, जॉर्ज लिंडे, नुवान थुशारा, कॉनर एस्टरहुइझेन, डेलानो पोटगिएटर, रॅसी व्हॅन डर डुसेन, थॉमस बेंजामिन, थॉमस बेंजामिन, कॉर्बिन बॉश, कॉलिन इंग्राम, रीझा हेंड्रिक्स, डेन पिएड, ट्रिस्टन लुस.

प्रिटोरिया कॅपिटल्स: ॲनरिक नॉर्टजे, जिमी नीशम, विल जॅक, रहमानउल्ला गुरबाज, लियाम लिव्हिंगस्टोन, विल स्मीड, मिगुएल प्रिटोरियस, रिले रॉसौ (कर्णधार), इथन बॉश, वेन पारनेल, सेनुरान मुथुसामी, काइल वेरेन, डॅरन डुपेन, डॅरन ट्वेन, काइल वॅरेन वुरेन, मार्क्स अकरमन, एविन लुईस, काइल सिमंड्स, कीगन लायन-कॅशेट.

पारल रॉयल्स: डेव्हिड मिलर (कर्णधार), मुजीब उर रहमान, सॅम हेन, जो रूट, दिनेश कार्तिक, क्वेना माफाका, लुआन-ड्रे प्रिटोरियस, ब्योर्न फोर्टुइन, लुंगी एनगिडी, मिचेल व्हॅन बुरेन, कीथ डडगेन, नकाबा पीटर, एंडिले फेहलुकवायो, कॉडी युसेफ, जॉन टर्नर, दयान गालीम, जेकब बेथेल, रुबिन हरमन, दिवाण मारीस.

सनरायझर्स ईस्टर्न केप: एडन मार्कराम (कर्णधार), जॅक क्रॉली, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लियाम डॉसन, ओटनील बार्टमन, मार्को जेन्सन, बेअर्स स्वानेपोएल, कॅलेब सेलेका, ट्रिस्टन स्टब्स, जॉर्डन हरमन, पॅट्रिक क्रुगर, क्रेग ओव्हरटन, टॉम एबेल, सायमन हार्मर, अँडिले सिमेलेन, डेव्हिड बेडिंगहॅम, ओकुहले सेले, रिचर्ड ग्लेसन, डॅनियल स्मिथ.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now