IPL Auction 2025 Live

T20 World Cup 2022: सूर्यकुमार यादवने मोहम्मद रिझवान टाकले मागे, टी-20 क्रिकेटमध्ये गाठले हे स्थान

भारताकडून सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) एक मोठा विक्रम केला असून त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे.

Surya Kumar Yadav & Mohammad Rizwan (Photo Credit - Twitter)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) शानदार फॉर्ममध्ये आहे. आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार शैलीत पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. यानंतर टीम इंडियाने नेदरलँडचा 56 धावांनी पराभव केला. त्यामुळे टीम इंडिया उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार बनली आहे. त्याचबरोबर भारताकडून सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) एक मोठा विक्रम केला असून त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे. सुर्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. नेदरलँड्सविरुद्ध त्याने अवघ्या 25 चेंडूंत 51 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. यासह तो 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे.

सूर्यकुमारने केल्या इतक्या धावा 

भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवने या वर्षात म्हणजे 2022 मध्ये आतापर्यंत 25 सामन्यांमध्ये 41.28 च्या सरासरीने 867 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने यावर्षी 20 सामन्यांत 51.56 च्या सरासरीने 839 धावा केल्या. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकातील दोन्ही सामन्यांमध्ये रिझवान फ्लॉप ठरला आहे. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022: टीम इंडियाचा विजय आणि पाकिस्तानचा पराभव पाहून शोएब अख्तर नाराज, केले असे वक्तव्य)

छोट्या कारकिर्दीत पाडली छाप 

सूर्यकुमार यादवने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. तो मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यावर मारा करू शकतो. त्याला भारताचा एबी डिव्हिलियर्स म्हणतात. त्याने भारतासाठी 36 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1111 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक झंझावाती शतकाची नोंद आहे.