SRH Vs RR, IPL 2019: सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना; कोण ठरणार गेमचेंजर?

ज्यात हैदराबाद संघाला आपल्या गोलंदाजीवर काम करावे लागेल. तर, राजस्थानला आपल्या फलंदाजीवर. राजस्थान संघाला केवळ बटलर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर विसंबून चालणार नाही. सर्व खेळाडूंनी संघासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे.

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, IPL 2019 | (Photo Credits-file photo)

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, IPL 2019: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) अर्थातच आयपीएल 2019 (IPL 2019) स्पर्धेच्या 12 व्या पर्वातील आठवा सामना आज सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या संघात होत आहे. हा सामना हैदराबाद (Hyderabad) येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium) होणार आहे. विशेष म्हणजे आज एकमेकांसमोर उभे ठाकलेले दोन्ही संघ या पर्वातील पहिला सामना पराभूत झालेले आहेत. हैदराबाद संघ कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात पराभूत झाला. तर, राजस्थान संघाला किंग्ज इलेवन पंजाब संघाकडून हार पत्करावी लागली होती.

सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांबाबत बोलायचे तर, दोन्ही संघांकडील खेळाडू दमदार आहेत. इतके की, हे खेळाडू दमदार खेळी करुन आपापल्या संघासाठी विजायावर दावा ठोकू शकतात. हैदराबाद संघात राशिद खान याची फिरकी, डेव्हिड वॉर्नर आणि विल्यम्सन यांची फलंदाजी तर, राजस्थान संघाकडील बटलर आणि स्टीव्ह स्मिथ गेमचेंजर ठरु शकतात. हैदराबाद संघाने मागच्या सामन्यात कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर तब्बल 181 धावा ठोकल्या. आंद्रे रसेल याच्या 19 चेंडूवर 49 धावांची नाबाद खेळीपुढे हैदराबादचे गोलंदाज वाढती धावसंख्या रोखू शकले नाहीत.

दरम्यान, आजच्या सामन्यात दोन्ही संघांसमोर आपापला पूर्व इतिहास पुसून नव्याने कामगिरी करण्याचे आव्हान असेन. ज्यात हैदराबाद संघाला आपल्या गोलंदाजीवर काम करावे लागेल. तर, राजस्थानला आपल्या फलंदाजीवर. राजस्थान संघाला केवळ बटलर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर विसंबून चालणार नाही. सर्व खेळाडूंनी संघासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे. सामन्यात सर्वांच्या नजरा या हैदराबाज संघाचे कर्णधार केन विल्यम्सन याच्यावर असतील. विल्यम्सन हा सध्या दुखापतीने त्रस्त आहे. दुखापतीच्या कारणास्तव तो पहिला सामना खेळू शकला नाही. त्याच्या उनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार यांने संघाचे नेतृत्व केले. आता संघाला विल्यम्सनच्या परतण्याची आस आहे.

राजस्थान संघाचा सलामीविर फलंदाच बटलर याला सध्या छान लय सापडली आहे. गोलंदाजी विभागात तो अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, स्टीव स्मित आणि बेन स्टोक्स यांना मदत करेन अशी आशा आहे. (हेही वाचा, RCB vs MI, IPL 2019: सामन्यातील शेवटच्या बॉलवरुन वाद; RCB कर्णधार विराट कोहली भडकला (Viral Video))

सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संगातील खेळाडू

हैदराबाद: केन विलियम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक शर्मा, जॉनी बेयरस्टो, खलील अहमद, रिकी भुई, बासिल थम्पी, श्रीवत्स गोस्वामी, मार्टिन गप्टिल, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद नबी, शाहबाज नदीम, टी. नटराजन, मनीष पांडे, यूसुफ पठान, राशिद खान, ऋद्धिमान साहा, संदीप शर्मा, विजय शंकर, शाकिब अल हसन आणि बिली स्टेनलेक.

राजस्थान: अजिंक्य रहाणे (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, संजू सैमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिड़ला, एस. मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, स्टीव स्मिथ, जोस बटलर, जोफरा आर्चर, ईश सोढ़ी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, जयदेव उनादकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लियाम लिविंगस्टोन, शुभम रंजाने, मनन वोहरा, एश्टन टर्नर, रियान पराग.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif