धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवत माजी ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेटपटूचे घरात घुसून अपहरण, 4 जणांना अटक

आता यामध्ये क्रिकेटपटूंचाही समावेश झाला आहे. मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू स्टुअर्ट मॅकगिल यांना त्यांच्या रःत्याअ घरातून बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सिडनी येथे 14 एप्रिल रोजी ही घटना घडली.

स्टुअर्ट मॅकगिल (Photo Credit: Twitter)

अलिकडच्या काळात बर्‍याच स्टार फुटबॉलर्सच्या घरी घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता यामध्ये क्रिकेटपटूंचाही समावेश झाला आहे. मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू स्टुअर्ट मॅकगिल (Stuart MacGill) यांना त्यांच्या रःत्याअ घरातून बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सिडनी (Sydney) येथे 14 एप्रिल रोजी ही घटना घडली. यानंतर त्यांना एका दुसऱ्या शहरात नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. ANI च्या वृत्तानुसार, जवळपास एका तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.पोलिसांनी चार जणांना अटक केली असून Daily Telegraph ने या प्रकरणाबाबत पहिले माहिती दिली. फॉक्स क्रिकेटमधील एका वृत्तानुसार, 14 एप्रिलला रात्री आठच्या सुमारास 46 वर्षीय वृद्ध व्यक्तीशी वाद झाल्यावर या माजी क्रिकेटपटूचं Cremorne येथून अपहरण करण्यात आलं.

“व्यापक तपासणीनंतर स्ट्राइक फोर्सच्या शोधकर्त्यांनी रॅप्टर पथक आणि सार्वजनिक सुव्यवस्था व दंगा पथकाच्या मदतीने आज (बुधवार 5 मे 2021) सकाळी 6 वाजल्यापासून 27, 29, 42 आणि 46 वर्षांच्या चार पुरुषांना अटक केली,” पोलिसांनीं आपल्या निवेदनात म्हण्टले आहे. “या लोकांना स्थानिक पोलिस ठाण्यात नेण्यात आले जेथे शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. अधिकारी सध्या सदरलँड, कॅरिंगबाह, ब्राइटन ले-सँड्स, बॅंक्सिया आणि मार्रिकविले येथे शोध वॉरंट बजावण्याच्या प्रक्रियेत आहेत.” कोणतीही खंडणी दिली नसली तरी अपहरण आर्थिकदृष्ट्या प्रेरित असल्याचे पोलिसांचे मत आहे.

दरम्यान, मॅकगिल यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी मॅकगिलने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून 44 कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळले होते. त्यांनी 208 कसोटी विकेट्स आणि वनडे करिअरमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. 50 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने 2011 मध्ये  बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्ससाठी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.