Stuart Binny, Mayanti Langer blessed with baby boy: आयपीएल मधील प्रसिद्ध अँकर Mayanti Langer हिने दिला गोंडस बाळाला जन्म, सोशल मीडियात फोटो शेअर करुन दिली खुशखबर
प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर ( Mayanti Langer) आणि भारतीय ऑलराउंडर स्टुअर्ड बिन्नी (Stuart Binny) यांच्या घरात एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कारण मयंती हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
Stuart Binny and Mayanti Langer Blessed With A Baby Boy: प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर ( Mayanti Langer) आणि भारतीय ऑलराउंडर स्टुअर्ड बिन्नी (Stuart Binny) यांच्या घरात एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कारण मयंती हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिने याबद्दलची माहिती स्वत: सोशल मीडियात दिली असून एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. मयंती हिच्या फोटोत तिचा चिमुकला मुलगा आणि नवरा स्टुअर्ड बिन्नी सुद्धा दिसून येत आहेत. हा फोटो तिने ट्वीटरवर शेअर करण्यासोबत एक खास पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. पण यंदाच्या आयपीएलच्या 13 व्या सीझनमध्ये ती अँकरिंग करताना दिसून येणार नाही आहे.(IPL 2020: कोण आहे मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक प्लेयर? दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने घेतले 'हे' नाव)
मयंती हिने असे म्हटले आहे की, काही लोकांना कळले असेलच तर काहीजण तर्कवितर्क लावत असतील. गेल्या पाच वर्षांपासून स्टार स्पोर्ट्स हे मला माझ्या परिवारासारखेच आहे. प्रेग्नंसीच्या वेळी त्यांनी माझी खुप साथ दिली. पण गर्भवती असतानाच आयपीएलसाठी काम सुरु ठेवायचे होते. परंतु आयपीएलच्या वेळेत बदल करण्यात आला. मी आमच्या मुलाचे गेल्या सहा आठवड्यांपूर्वीच स्वागत केले आहे.(IPL 2020: मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा पूर्ण करणार षटकारांचे द्विशतक, 'हे' 4 आयपीएल रेकॉर्ड करण्याच्या तयारीत हिटमॅन, जाणून घ्या)
So I’m going to love watching the IPL @StarSportsIndia all the best to the team 😁 @jatinsapru @suhailchandhok @cricketaakash @SanjanaGanesan @ProfDeano @scottbstyris @BrettLee_58 @Sanjog_G and the full gang!! pic.twitter.com/fZVk0NUbTi
— Mayanti Langer Binny (@MayantiLanger_B) September 18, 2020
यासह मयंतीने कॉमेंट्री टीमला शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. नुकत्याच स्टार स्पोर्ट्सकडून कॉमेंट्री बद्दल जाहीर करण्यात आले होते. टीम मध्ये आता मयंती ऐवजी ऑस्ट्रेलियाची अँकर नेरोली मीडोस हिला घेण्यात आले आहे. तर युएई मध्ये उद्या म्हणजेच 19 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या टूर्नामेंटमध्ये प्रथमच ती अँकरिंग करताना दिसून येणार नाही आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2020 08:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

