ICC Test Rankings: विराट कोहली याने गमावले टेस्ट रॅंकिंगमधील अव्वल स्थान; अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल याचा टॉप-10 मध्ये समावेश
नुकतीच आयसीसीने आतंरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट रॅंकिंगची यादी जाहीर केली आहे. या यादीत मोठे बदल झाले असून भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) टेस्ट क्रिकेट रॅंकिंगमधील ICC Test Cricket Rankigs 2020) अव्वल स्थान गमवावे लागले आहे.
नुकतीच आयसीसीने आतंरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट रॅंकिंगची यादी जाहीर केली आहे. या यादीत मोठे बदल झाले असून भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) टेस्ट क्रिकेट रॅंकिंगमधील ICC Test Cricket Rankigs 2020) अव्वल स्थान गमवावे लागले आहे. विराट कोहलीकडून गेल्या काही सामन्यांमध्ये निराशाजनक प्रदर्शन पाहायला मिळाले आहे. न्यूझीलंड संघासोबत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दोन्ही डावात मिळून केवळ 21 धावा केल्या आहेत. यातच भारताचे फलंदाज अजिंक्य राहाणे (Ajinkya Rahane), आणि मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) यांनी चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर टॉप-10 मध्ये झेप घेतली आहे. अजिंक्य राहाणे 8वे तर, मंयक अग्रवाल यांनी 10 वे स्थान मिळवले आहे. यामुळे सोशल मीडियावर या दोघांचे कौतुक केले जात आहेत. तसेच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याची 7 व्या स्थानावरून 9 व्या स्थानावर घसरण झाली आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.
मयंक अग्रवाल यांनी व्हेलिंगटनच्या कसोटी सामन्यात 92 धावा केल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने 727 पॉईंटसह टेस्ट क्रिकेट रॅंकिंगमधील 10वे स्थान मिळवले आहे. तसेच गेल्या सामन्यात 75 धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणे यालाही याचा फायदा झाला आहे. त्याने 9 व्या स्थानावरून 8 व्या स्थानावर झेप घेतली आहे. पुजारा याने गेल्या 2 डावात केवळ 11 धावा केल्यामुळे त्याची आयसीसी टेस्ट क्रिकेट रॅंकिंगमध्ये घसरण झाली आहे. हे देखील वाचा- युजवेंद्र चहल याने शेअर केला नवा टिक टॉक व्हिडीओ;रोहित शर्मा आणि खलिल अहमद सोबतची मस्ती पाहुन हसुन व्हाल हैराण
याशिवाय आसीसी टेस्ट क्रिकेट रॅंकिंगमध्ये फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्वीन याला मोठा फटका बसला आहे. अश्वीन 765 पॉईंटसह 9 व्या स्थानावर आहे. त्याने गेल्या टेस्ट सामन्यात 99 धावा देऊन 3 विकेट घेतल्या आहेत. तरी देखील आयसीसी रॅंकिंगमधून अश्वीनची घसरण झाली आहे. दुखापतीनंतर संघात जागा मिळवलेल्या ईशांत शर्माला फायदा झाला आहे. त्याने न्यूझीलंड संघासह झालेल्या टेस्ट समान्यात 5 विकेट घेऊन उत्तम कामगिरी केली आहे. यामुळे त्याने 18 व्या स्थानावरून 17 स्थानावर पोहचला आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह 11 वे, मोहम्मद शामी 15 वे, रविंद्र जडेजा 18 वे तर, उमेश यादव 20 स्थानावर आहेत. या यादीत आस्ट्रेलियाचा पेट कमिंस 904 पॉईंटसह अव्वल स्थानावर आहे.
ऑलराउंडरच्या यादीत भारताचा खेळाडून रविंद्र जडेजा तिसऱ्या तर, आणि रविचंद्रन अश्विन पाचव्या स्थानावर आहेत. व्हेलिंगटन येथे खेळला गेलेल्या सामन्यात जडेजा याला जागा मिळाली नव्हती. तर, दुसरीकडे आर अश्विनने न्यूझीलंड संघासह झालेल्या सामन्यात दोन्ही डावात केवळ 4 धावा केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, वेस्ट इंडिज संघाचा ऑलराउंडर जेसन होल्डर 473 पॉइंटलह पहिल्या स्थानावर आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)