टी-20 रँकिंग: 'हॅट-ट्रिक मॅन' लसिथ मलिंगा याने T-20I क्रमवारीत घेतली 20 स्थानांची झेप, पहा कोण कितव्या स्थानावर
श्रीलंकेचा वेगवान लसिथ मलिंगाने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मॅचमध्ये हॅट-ट्रिकघेत गोलंदाजांच्या नवीन एमआरएफ टायर्सच्या आयसीसी पुरुषांच्या टी-20 क्रमवारीत 20 स्थानांची झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी गोलंदाजी करत मलिंगा आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत 21 व्या स्थानी झेप घेतली.
श्रीलंकेचा (Sri Lanka) वेगवान लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मॅचमध्ये चार बॉलमध्ये चार विकेट्स घेत क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली. यासह मलिंगाने गोलंदाजांच्या नवीन एमआरएफ टायर्सच्या आयसीसी पुरुषांच्या टी-20 क्रमवारीत 20 स्थानांची झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी गोलंदाजी करत मलिंगा आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत 21 व्या स्थानी झेप घेतली. मलिंगा टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात मलिंगाने चार ओव्हरमध्ये एक मेडन ओव्हरसह सहा धावा देत पाच गडी बाद केले. (लसिथ मलिंगा याने हॅट्रिकसह 4 चेंडूत घेतल्या 4 विकेट्स, T20 च्या सामन्यात रचला इतिहास)
मलिंगाशिवाय अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान याने टी-20 क्रमवारीत आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. न्यूझीलंडचा मिशेल सेंटनर सहाव्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर आला आहे, तर भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव आठव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू कोलिन डी ग्रॅन्डहोम, याने तीन सामन्यात 103 धावा करत मालिकेत सर्वाधिक धावा केल्या, त्याने 43 स्थानांची झेप घेतली आणि फलंदाजीच्या क्रमवारीत 80 वे स्थान गाठले तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये पहिल्या 20 मध्ये स्थान मिळवले. दुसर्या टी-20 मध्ये त्याने 46 चेंडूत 59 धावांची खेळी करत श्रीलंकेला 162 धावांचे आव्हान ठेवले आणि मालिकेत न्यूझीलंडला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. कुंडल मेंडिसने डे ग्रॅन्डहोमेपेक्षा एक धाव जास्त केली आणि 33 गुणांची कमाई करत 40 व्या स्थानावर झेप घेतली. बाबर आझम अजूनही टी-20 क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे तर ग्लेन मॅक्सवेल याने दुसर्या क्रमांकावरील कॉलिन मुनरोबरोबर आपले स्थानाची अदला-बदल केली. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज मिशेल सॅनटनर याने सहा स्थानांची झेप घेत पहिले दहामध्ये प्रवेश मिळवला आणि सध्या तो पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, टिम साऊदी याने 14 स्थानांची झेप घेत 15 वे स्थान मिळवले.
दुसरीकडे, शुक्रवारी न्यूझीलंडला स्वस्तात बाद करणारा मलिंगा टी-२० आणि वनडे सामन्यात सलग चार बॉलमध्ये चार विकेट मिळवणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मलिंगाची ही एकूणच पाचवी हॅटट्रिक होती. यासह, मलिंगाने टी-२० सामन्यातही 100 विकेट्स पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी 8 गडी राखून 125 धावा केल्या. सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेले किवी फलंदाजांवर श्रीलंकाई गोलंदाजांनी आक्रमक बॉलिंग केली आणि संपूर्ण किवी संघ फक्त 88 धावांवर बाद झाला. हे सर्व असूनही न्यूझीलंडने 3 सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)