Isuru Udana Retires: श्रीलंकेला मोठा धक्का! इसुरू उदाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, भारताविरुद्धची टी -20 मालिका ठरली शेवटची
हा श्रीलंकेच्या संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
श्रीलंकेचा (Sri Lanka) अष्टपैलू खेळाडू इसुरू उदानाने (Isuru Udana) आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा श्रीलंकेच्या संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेत त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर आज उदानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. उदाना घरगुती आणि फ्रॅंचायझी किक्रेट खेळत राहणार आहे. त्याने त्याने दोन हंगामापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले होते.
उदानाला भारताविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात त्याला खेळता आले नाही. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला. श्रीलंकेने 2-1 असा विजय मिळवत ट्रॉफी जिंकली. यानंतर उदानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हे देखील वाचा- Tokyo Olympics 2020: भारतीय हॉकी महिला खेळाडू वंदना कटारियाची उल्लेखनीय कामगिरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात घेतली हॅटट्रिक
ट्वीट-
उदानाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. उदानाने त्याच्या कारकिर्दीत 21 एकदिवसीय आणि 35 टी-20 सामने खेळले आहेत. उदानाने टी-20 सामन्यात 27 विकेट्स आणि 256 धावा केल्या आहेत. त्याला भारताविरुद्ध 2012 मध्ये घरच्या मैदानावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तर, 21 एकदिवसीय सामन्यात त्याने 12 विकेट्स घेतले आहेत आणि 237 धावा केल्या आहेत.