Sri Lanka vs West Indies, 3rd ODI Match 1st Inning Scorecard: तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजला दिले 195 धावांचे लक्ष्य, कुसल मेंडिसने केवळ 22 चेंडूत केल्या 56 धावा
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली.
Sri Lanka National Cricket Team vs West Indies National Cricket Team 3rd ODI Match 2024 Scorecard: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) तिसरा सामना आज म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पल्लेकेले (Pallekele) येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Pallekele International Cricket Stadium) खेळला जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघ क्लीन स्वीप करण्यासाठी मैदानात उतरेल, तर वेस्ट इंडिज संघाला व्हाईट वॉश टाळायचा आहे. श्रीलंकेची कमान चारिथ असलंका यांच्या हाती आहे. तर वेस्ट इंडिजचे नेतृत्व शाई होप करत आहे. (हेही वाचा - SL vs WI 3rd ODI 2024: श्रीलंका - वेस्टइंडिजमधल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय, लंकेने 17.2 षटकांत केल्या 1 गडी गमावून 81 धावा )
पाहा पोस्ट -
दरम्यान, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली.
पावसाने पुन्हा एकदा सामना विस्कळीत केला. त्यानंतर 23-23 षटकांचा सामना निश्चित झाला. श्रीलंकेच्या संघाने 23 षटकांत तीन गडी गमावून 156 धावा केल्या. श्रीलंकेसाठी कुसल मेंडिसने सर्वाधिक नाबाद 56 धावांची खेळी खेळली.
या खेळीदरम्यान कुसल मेंडिसने 22 चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकार ठोकला. कुसल मेंडिसशिवाय सलामीवीर पथुम निसांकाने 56 धावा केल्या. रोस्टन चेसने वेस्ट इंडिज संघाला पहिले यश मिळवून दिले. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेस आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला 23 षटकात 195 धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकून वेस्ट इंडिज संघाला मालिकेत क्लीन स्वीप टाळायचा आहे.