SL vs WI 3rd ODI 2024: श्रीलंका - वेस्टइंडिजमधल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय, लंकेने 17.2 षटकांत केल्या 1 गडी गमावून 81 धावा

वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. यावेळी पथूम निस्सांका आणि अविश्का फर्नांडो यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली.

SL vs WI 3rd ODI 2024: श्रीलंका - वेस्टइंडिजमधल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय, लंकेने 17.2 षटकांत केल्या 1 गडी गमावून 81 धावा
WI vs SL (Photo Credit - X)

Sri Lanka National Cricket Team vs West Indies National Cricket Team:   श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Pallekele International Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघ क्लीन स्वीप करण्यासाठी मैदानात उतरेल, तर वेस्ट इंडिज संघाला व्हाईट वॉश टाळायचा आहे. श्रीलंकेची कमान चारिथ असलंका यांच्या हाती आहे. तर वेस्ट इंडिजचे नेतृत्व शाई होप करत आहे. दरम्यान या सामन्यात या सध्या पावसाचा व्यत्यय पहायला मिळत आहे.  (हेही वाचा  -  SL vs WI 3rd ODI 2024 Live Toss Updates: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली, श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11 )

वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. यावेळी पथूम निस्सांका आणि अविश्का फर्नांडो यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. पाथुम निसांका सध्या नाबाद असून त्यांने 53 चेंडूत 44 धावा करून नाबाद आहे, त्याच्या या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे.  अविष्का फर्नांडोने 50 चेंडूत 34 धावा केल्या असून त्याच्या या खेळीत चार चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे.  पावसाने जेव्हा खेळ थांबला तेव्हा 17.2 चेंडूत 81 धावा केल्या आहे.

पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन 

वेस्ट इंडिज क्रिकेट संघ: ब्रँडन किंग, एविन लुईस, केसी कार्टी, शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, ज्वेल अँड्र्यू, रोस्टन चेस, गुडाकेश मोती, मॅथ्यू फोर्ड, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ: पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, महिष थेक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशांका.

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2024 04:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).