Sri Lanka Economic Crisis: आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर Asia Cup 2022 चे आयोजित करण्याचा श्रीलंकेला अल्टिमेटम, ‘या’ तारखेपर्यंत उत्तर द्यावे लागणार

27 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या आशिया चषक 2022 च्या यजमानपदाचे अधिकार श्रीलंकेकडे आहेत परंतु देश सध्या गंभीर आर्थिक संकटाला तोंड देत असल्यामुळे श्रीलंका क्रिकेट टी-20 स्पर्धेचे आयोजन करण्याच्या अनिश्चिततेत भर पडली आहे. अशा परिस्थितीत त्यांना प्रोटोकॉलनुसार निर्णय घेण्यासाठी वेळ मर्यादा देण्यात आली आहे

आशिया कप ट्रॉफी (Photo Credit: Twitter)

आर्थिक संकटामुळे (Economic Crisis) देशभरात मोठ्या प्रमाणात निषेध होत असताना आशिया चषक (Asia Cup) 2022 चे यजमानपद भूषवता येईल की नाही याची पुष्टी करण्यासाठी श्रीलंकेला (Sri Lanka) 27 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 27 ऑगस्टपासून खेळल्या जाणार्‍या आशिया कप 2022 चे यजमानपद श्रीलंकेकडे आहे. परकीय चलन साठ्यात घट झाल्यामुळे श्रीलंका वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तू व इंधनाच्या तीव्र टंचाईशी झुंज देत आहे. अर्जुन रणतुंगा (Arjuna Ranatunga) आणि सनथन जयसूर्या (Sanath Jayasuriya) यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी सरकारविरोधात निदर्शनात देशातील सार्वजनिक रॅलींमध्ये भाग घेतला. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asian Cricket Council) जवळच्या सूत्राने इंडिया टुडेला सांगितले की ACC चे अधिकारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांच्या सतत संपर्कात आहेत, जे अजूनही आशिया चषकाचे यजमानपदासाठी आशावादी आहेत. (Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाची तारीख जाहीर, भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार)

अंतिम निर्णय घेण्यासाठी श्रीलंकेला 27 जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे, असे सूत्राने सांगितले. जर SLC प्रीमियर स्पर्धेचे आयोजन करण्यास सक्षम नसल्यास आशियाई क्रिकेट परिषद आशिया चषक श्रीलंकेच्या बाहेर हलवण्याची योजना तयार करेल. 2020 आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेत होणार होते परंतु कोविड-19 महामारीमुळे स्पर्धा दोनदा पुढे ढकलण्यात आली. लक्षणीय आहे की 2023 मध्ये होणाऱ्या महाद्वीपीय स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या वर्षा अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारीच्या दृष्टीने आशिया चषक टी-20 फॉर्मेटमध्ये आयोजित केला जाईल. अखेरीस 2018 मध्ये यूएईमध्ये आशिया कप आयोजित करण्यात आला होता आणि तो भारताने जिंकला होता.

दरम्यान, सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार श्रीलंका आशिया चषकचे आयोजन करणार की नाही याची अद्याप पुष्टी केली जाऊ शकत नाही. स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी श्रीलंका अजून सकारात्मक आणि आशावादी असल्याचेही सूत्रांनी म्हटले. अशा परिस्थितीत त्यांना प्रोटोकॉलनुसार निर्णय घेण्यासाठी वेळ मर्यादा देण्यात आली आहे

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now