श्रीलंकेला मिळाला अजून एक लसिथ मलिंगा; 17-वर्षीय मथीशा पथिराना ने 7 धावांत घेतल्या 6 विकेट्स, (Video)
याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलिंगाने क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्त होण्याआधी श्रीलंकाला माथेषा पाथिराना याच्या रूपात एक नवीन मलिंगाच जणू सापडला आहे.
क्रिकेट विश्वातील सर्वात वेगवान गोलंदाज श्रीलंकेचा लसिथ मलिंगा (Sri Lanka) खेळातील सर्वश्रेष्ठ खेळवुनपैकी एक आहे. मलिंगाने नुकतेच आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळे, श्रीलंका संघाला खेळाच्या या फॉर्ममध्ये मलिंगाची उणीव जाणवत आहे. मलिंगाने 2010 मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्याने 30 टेस्ट सामन्यांत 101 विकेट्स, तर वनडेमध्ये 226 मॅचमध्ये 338 विकेट्स घेतल्या आहेत. एकिकडे मलिंगा पर्व शेवटाच्या दिशेनं वाटचाल करत असताना श्रीलंकेत आता नवा मलिंगा तयार होत आहे. आणि याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलिंगाने क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्त होण्याआधी श्रीलंकाला मथीशा पाथिराना (Matheesha Pathirana) याच्या रूपात एक नवीन मलिंगाच जणू सापडला आहे. (लसिथ मलिंगाने हॅट्रिकसह 4 चेंडूत घेतल्या 4 विकेट्स, T20 च्या सामन्यात रचला इतिहास)
17 वर्षीय पाथिराना मलिंगासारखीच स्लिंगिंग अक्शन ने गोलंदाजी करतो. शिवाय, यॉर्कर्ससमवेत त्याची स्लो गोलंदाजीही घातक आहे. त्याने ट्रिनिटी कॉलेजसाठी केलेल्या घातक गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाथिरानाचा चेंडू खेळणे फलंदाजांना कठीण जात असताना दिसून येते. ट्रिनिटी कॉलेजसाठी पदार्पणाच्या मॅचमध्येपाथिरानाने प्रतिस्पधी संघाला फक्त 7 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या आणि त्यांना गोत्यात पडले. महाविद्यालयीन क्रिकेटमधील पाथिरानाच्या विध्वंसकी गोलंदाजीचा 'हा' हायलाइट व्हिडिओ:
प्रांतीय स्पर्धेसाठी अंडर-19 श्रीलंका संघात पाथिरानाची निवड झाली आहे. आणि मलिंगासह त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत. दरम्यान, मलिंगासारखे सतत यॉर्कर गोलंदाजी करण्यासाठी अथक परिश्रम आणि प्रयास करावा लागतो. सध्या, मलिंगा नंतर यॉर्कर टाकण्याच्या शैलीत भारताच्या जसप्रीत बुमराह याचे नाव प्रथम सर्वांच्या तोंडावर येते. बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू देखील टिकून राहू शकले नाही.