SRH vs RR, IPL 2020: डेविड वॉर्नरचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, राजस्थान रॉयल्समध्ये बेन स्टोक्सची एंट्री
सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
SRH vs RR, IPL 2020: सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील आयपीएल (IPL) सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सला मागील 4 सामन्यात पराभव पत्करावा लागला असल्याने त्यांना स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांना आजचा सामना जिंकणे महत्वाचे आहे. आजच्या सामन्यासाठी सनरायझर्स आणि रॉयल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान सातव्या स्थानावर आहे तर सनरायझर्स पाचव्या स्थानावर आहे. रॉयल्स आणि सनरायजर्सची टाकत त्यांचे आघाडीचे फलंदाज आहेत, पण मधली फळी अद्यापही चिंतेचे कारण बनलेले आहे. (SRH vs RR, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमधून अब्दुल समदला बाहेर केले असून त्याच्या जागी विजय शंकरला संधी दिली आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने 4 बदल केले आहेत. रॉयल्ससाठी बेन स्टोक्स आपला पहिला आयपीएल 2020 सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. स्टोक्सला संघात सामील करणे रॉयल्ससाठी महत्वाचे मानले जात आहे. रॉयल्सने यशस्वी जयस्वाल, महिपाल लोमरोर वरुण आरोन, आणि अँड्र्यू टाय यांना बाहेर बसवले आहे. दरम्यान, स्टोक्सचे आगमन रॉयल्ससाठी फलदायी ठरणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. स्टोक्सच्या आगमनाने टीमच्या पराभवाची साखळी तुटेल आणि ते विजय मार्गावर परत येतील अशी टीमला आशा आहे. स्टोक्ससह रियान पराग आणि रॉबिन उथप्पा आणि जयदेव उनाडकट देखील अंतिम-11 मध्ये परतले आहेत. उथप्पा यंदा रॉयल्सकडून जोस बटलरसह डावाची सुरुवात करेल.
पाहा सनरायजर्स आणि रॉयल्सचे प्लेइंग इलेव्हन
सनराइजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कप्तान), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विल्यमसन, विजय शंकर, अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राशिद खान, संदीप शर्मा, खलील अहमद, टी नटराजन.
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर (विकेटकीपर), रॉबिन उथप्पा, स्टिव्ह स्मिथ (कप्तान), संजू सॅमसन, रियान पराग, बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)