SRH vs RCB, IPL 2020: कोहलीचा 'विराट' पराक्रम; एमएस धोनी, गौतम गंभीर, रोहित शर्मा यांच्या एलिट यादीत झाला समावेश
कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीचा हा 50 वा विजय आहे. या विक्रमासह 50 पेक्षा विराट एमएस धोनी, रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांसारख्या कर्णधारांच्या एलिट यादीत सामील झाला. आयपीएलमध्ये फ्रँचायझीसाठी 50 विजय मिळवून देणारा विराट चौथा कर्णधार ठरला आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) आयपीएलमधील (IPL) पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) 10 धावांनी विजय मिळवला आणि 13व्या हंगामाची दणदणीत सुरुवात केली. कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीचा (RCB) हा 50 वा विजय आहे. या विक्रमासह 50 पेक्षा विराट एमएस धोनी (MS Dhoni), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांसारख्या कर्णधारांच्या एलिट यादीत सामील झाला. आयपीएलमध्ये फ्रँचायझीसाठी 50 किंवा अधिक जास्त विजय मिळवून देणारा विराट स्पर्धेतील चौथा कर्णधार ठरला आहे. विराट 2011 पासून आरसीबीने नेतृत्व करत असून कर्णधार म्हणून 111 सामन्यात 50 सामन्यात टीमने विजय मिळवला आहे. आयपीएलच्या इतिहासात धोनीने 105, गंभीरने 71 आणि रोहितने 60 असे 50 हुन अधिक सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. (SRH vs RCB, IPL 2020: युजवेंद्र चहल याच्या जाळ्यात सनरायजर्स हैदराबाद जायबंदी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी सलामी)
धोनी, गंभीर आणि रोहित यांनी या दरम्यान 9 जेतेपद जिंकले आहेत, कोहली अद्याप नऊ सत्रात कर्णधार असूनही आरसीबीला अजिंक्यपद पटकावता आले नाही. कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ 2016 मध्ये अंतिम सामन्यात पोहचला होता. विराटने या सत्रात चार शतकासह विक्रमी 973 धावा केल्या होत्या, पण टीमला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही.
दरम्यान, आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर यजुवेंद्र चहलच्या फिरकीपुढे हैदराबादचे फलंदाज अपयशी ठरले. चहलच्या गोलंदाजीमुळे आरसीबीने हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला आणि आयपीएलची विजयी सुरुवात केली. चहलने आपल्या चार ओव्हरमध्ये फक्त 18 धावा देत 3 बळी घेतले. यापैकी दोन विकेट 16 व्या षटकांत घेत सामना फिरवला. चहलने सुरुवातीला जॉनी बेअरस्टोची महत्वपूर्ण विकेट मिळवली, त्यानंतर विजय शंकरलाही त्याचा ओव्हरमध्ये माघार पाठवले. दमदार सुरुवातीनंतर हैदराबाद संघाला सामना गमावावा लागला. अखेरच्या चार ओव्हरमध्ये हैदराबादने 8 विकेट गमावल्या. बेंगलोरने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोला वगळता इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. बेअरस्टोने 61 धावा केल्या. दुसरीकडे, बेंगलोरकडून नवदीप सैनी एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. तर, शिवम दुबेनेही दोन विकेट घेतल्या. आरसीबीचा पुढील आयपीएल सामना 24 सप्टेंबर रोजी, किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध होईल.