SRH vs KKR Preview: हैदराबाद आणि कोलकाता संघ प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उतरणार मैदानात, जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल आणि रेकॉर्ड

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सध्या आठव्या क्रमांकावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद नवव्या क्रमांकावर आहे.

KKR vs SRH (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात सामना रंगणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून हा सामना होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सध्या आठव्या क्रमांकावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद नवव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व इडन मार्कराम करणार आहे तर कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व नितीश राणा करणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला सलग तीन सामन्यांपासून सुरू असलेली पराभवाची मालिका संपवायची आहे, तर हैदराबाद संघाला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे.

पहा हेड टू हेड आकडे ?

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत 24 सामने झाले आहेत. यापैकी कोलकाताने 15 सामने जिंकले आहेत तर हैदराबादने 9 सामने जिंकले आहेत. आयपीएल 2023 मध्ये दोघांमध्ये खेळलेला पहिला सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला होता. या सामन्यात हॅरी ब्रूकने शतक झळकावले. (हे देखील वाचा: SRH vs KKR Free Live Streaming Online: हैदराबाद आणि कोलकाता होणार आज जबरदस्त सामना, घरबसल्या कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून)

कशी आहे हैदराबादची खेळपट्टी ?

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 180 धावांची आहे. पहिल्या डावात चेंडू बॅटला चांगला येतो, त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक फायदा होऊ शकतो. तर दुसऱ्या डावात चेंडू थोडा कमी झाला असता, त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दोन्ही संघांपैकी प्लेइंग 11 खेळण्याची शक्यता 

कोलकाता नाईट रायडर्स : एन जगदीसन, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसे, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद : मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, एडन मार्कराम (कर्णधार), मयंक मार्कंडे, बी कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, मार्को जॉन्सन.