SRH vs KKR, IPL 2020 सामन्यातील अंपायर पुरुष की महिला? पश्चिम पथक यांची हेअरस्टाईल पाहून यूजर्समध्ये संभ्रम, उभे राहण्याची पद्धतीवर मिम्स व्हायरल
अंपायरिंग करत असताना त्यांची शैलीची चाहत्यांना भुरळ पडली आणि अंपायर पश्चिम पाठकच्या लांब केसांचा लूकदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
SRH vs KKR, IPL 2020: सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders( यांच्यातील आजचा आयपीएल (IPL) सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. पण या आजच्या सामन्यात खेळाडूंच्या खेळापेक्षा आपल्या हेअरस्टाईलमुळे ऑनफिल्ड अंपायरांपैकी एक अंपायर पश्चिम पाठक (Pashchim Pathak) चर्चेचा विषय बनले. अंपायरिंग करत असताना त्यांची शैलीची चाहत्यांना भुरळ पडली आणि अंपायर पश्चिम पाठकच्या लांब केसांचा लूकदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाठक यांच्याबद्दल सोशल मीडियावर बरेसचे मिम्स व्हायरल होत आहे. अंपायर पश्चिम पाठक यांनी भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम केले आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पाठक यांनी हेल्मेट घालून अंपायरिंग केली होती ज्याची देखील बरीच चर्चा रंगली होती. (SRH vs KKR, IPL 2020: लोकी फर्ग्युसनने फेरले डेविड वॉर्नरच्या खेळीवर पाणी, नाईट रायडर्सचा सनरायजर्स हैदराबादवर Super विजय)
आजच्या सामन्यात पाठक लांब केसांसह ‘रॉकस्टार’ स्टाईल लूकमध्ये दिसून आले ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आणि पहिल्यांदा त्यांच्याकडे पाहिल्यावर अनेकांना ते महिला अंपायर असल्याचे भासले, त्यामुळे नेटकऱ्यांनी ट्विटरवर नक्की ते पुरुष आहेत का महिला असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. शिवाय अंपायरिंग दरम्यान त्यांच्या उभ्या राहण्याच्या पद्धतीवरही सोशल मीडियावर मिम्स व्हायरल झाले आहेत.
रॉकस्टार अंपायर
बाल पण मस्त, नाव पण मस्त
सामन्याचे फील्ड अंपायर
हेल्मेटसह किंवा हेल्मेटशिवाय?
माझे आवडते अंपायर
लांब केस
अंपायर शैली
अंपायर सुमो
पश्चिम पाठक हे 43 वर्षीय आंतरराष्ट्रीय आणि घरगुती क्रिकेट अंपायर आहेत. पाठक यांनी 2012 मध्ये दोन महिला वनडे सामन्यात अंपायरची भूमिका बजावली आहे. ते भारतात झालेल्या दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठीही स्टँडबाई अंपायर होते. घरगुती आघाडीवर, अंपायर म्हणून हा त्यांचा 9 वा इंडियन प्रीमियर लीग सामना आहे. त्यांनी 2014 हंगामापासून सुरुवात केली. इतकंच नाही तर गेली अनेक दशके ते भारतीय घरगुती क्रिकेट सर्किटमध्ये कार्यरत आहेत. 2015मध्ये ते खेळपट्टीवर कामकाज पहात असताना हेल्मेट घालणारे पहिते पंच होते. मटार, जर त्यांनी आज हेल्मेट घातले असते तर यूजर्सना त्यांची हेअरस्टाईल पाहण्यापासून वंचित राहिले असते.