SRH vs KKR, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रविवारी आयपीएलच्या डबल-हेडरचा पहिला सामना खेळला जाईल. अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

SRH vs KKR, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Image)

SRH vs KKR, IPL 2020 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात रविवारी आयपीएलच्या (IPL) डबल-हेडरचा पहिला सामना खेळला जाईल. या हंगामातील आयपीएलचा हा 35 वा सामना असेल. गेल्या दोन सामन्यात केकेआरचा पराभव झाला आहे, सनरायझर्स हैदराबादमध्येही असेच घडले आहे. दोन्ही संघांना विजयी मार्गावर परतण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. अबू धाबी (Abu Dhabi) येथील शेख झायेद (Sheikh Zayed) क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता टॉस होणार असून सामना 3.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (MI vs KKR, IPL 2020: दिनेश कार्तिकने इयन मॉर्गनला केकेआरचे नेतृत्व करण्यास कसे सांगितले? नव नियुक्त KKR कॅप्टनने केले उघड)

दोन्ही संघांना प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय आवश्यक आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे, तर हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे. कोलकाताने मागील कर्णधार बदलला पण त्याचे नशिब बदलले नाही. मागील मॅचयामध्ये त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध सहज पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद अनेक दिवसानंतर मैदानात उतरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शेवटचे दोन सामने हैदराबादने गमावले आहेत.

पाहा सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ

सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), केन विल्यमसन, मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, अब्दुल समद, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिचेल मार्श, फॅबियन अ‍ॅलेन, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, संजय यादव, रिद्धिमान सहा, संदीप बवानका आणि श्रीवत्स गोस्वामी.

कोलकाता नाईट रायडर्स: इयन मॉर्गन (कॅप्टन), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लोकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नारायण, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, एम सिद्धार्थ, क्रिस ग्रीन, टॉम बंटन, प्रवीण तांबे आणि निखिल नायक.

(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2020 12:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).