SRH Vs DC, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे

DC vs SRH (Photo Credits-File Image)

SRH Vs DC, 47th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 47व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ (Sunrisers Hyderabad Vs Delhi Capitals) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्टीय मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकूण संघाने प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाचे नेतृत्व डेव्हिड वार्नर (David Warner) करत आहेत. तर,दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे कर्णधार पद श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) संभाळत आहे. तसेच आजचा सामना हैदराबादच्या संघासाठी महत्वाचा ठरणार आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडचणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- IPL 2021: आयपीएलच्या पुढील हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे नेतृत्व कोण करणार? पाहा काय म्हणाले, सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन

सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बेसिल थंपी, यरा पृथ्वीराज, बिली स्टॅनलेक, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल , खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृध्दिमान साहा, अब्दुल समद, फॅबियन अलन, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, संदीप बावनका, संजय यादव, विराट सिंग.

दिल्लीची राजधानी: अजिंक्य रहाणे, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमीयर, मार्कस स्टोइनिस, अ‍ॅक्सर पटेल, रविचंद्रन अश्विन, कॅगिसो रबाडा, अनरिच नॉर्टजे, तुषार देशपांडे, पृथ्वी शॉ, डॅनियल पटेल, हर्षल पटेल , मोहित शर्मा, अ‍ॅलेक्स कॅरी, अवेश खान, प्रवीण दुबे, संदीप लामिछाने, कीमो पॉल, ललित यादव.