SRH vs DC, IPL 2019: सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Live Streaming इथे पाहू शकता

राजीव गांधी इंटरनॅशन क्रिकेट स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium) आज आयपीएलचा (IPL) सामना सनराइजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) संघामध्ये रंगणार आहे.

DC vs SRH (Photo Credits-IANS)

IPL 2019: राजीव गांधी इंटरनॅशन क्रिकेट स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium) आज आयपीएलचा (IPL) सामना सनराइजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) संघामध्ये रंगणार आहे. दोन्ही संघ या सीझनमध्ये दुसऱ्यांद्या एकमेकांच्या समोर पुन्हा एकदा येणार असून त्यांच्यामध्ये आज लढत होणार आहे. तर दिल्ली संघा आजच्या सामन्यात विरोधी संघाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी खेळताना दिसून येणार आहेत. सामन्याचे लाईव्ह स्ट्रमिंग पाहण्यासाठी Hotstar येथे क्लिक करा.

गेल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर दिल्ली संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसऱ्या बाजूलाा हैदराबाद संघाला गेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. तसेच हैदराबाद संघाचा नियमित कर्णधार केन विलियम्सन संघात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

तर शिखर धवन सुद्धा संघात परतला असल्याने दिल्ली संघाची सुद्धा फलंदाजी उत्तम राहणार आहे. धनव ह्याने कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध नाबाद 97 धावा काढत दिल्लीच्या संघाला विजय मिळवून दिला होता. तसेच रिषभ पंत ह्याच्याकडून आजच्या सामन्यासाठी उत्तम खेळी केली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.