भारतात परतण्यापूर्वी विराट कोहली याने बोलावली खास मिटिंग; संघातील युवा खेळाडूंना केले मार्गदर्शन

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS Test Series 2020) यांच्या दरम्यान झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला तिसर्‍या दिवशीच लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.

विराट कोहली (Photo Credit: ICC/Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS Test Series 2020) यांच्या दरम्यान झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला तिसर्‍या दिवशीच लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. महत्वाचे म्हणजे, पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. मात्र, मायदेशी परतण्यापूर्वी कोहलीने एक खास मिटिंग घेतल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. दरम्यान, पुढच्या सामन्यासाठी संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते, अशीही माहिती समोर येत आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागले. यामुळे कोहलीने संघाची खास मिटिंग बोलावली होती. यावेळी युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी उत्तेजन कसे देता येईल, यावर भर दिल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विराट कोहली म्हणाला की, पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आम्ही चांगली कामगिरी केली होती. पण त्यानंतर खराब कामगिरीमुळे भारताचा डाव कोसळला आणि पराभव पदरी पडला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात जी गोलंदाजी केली. त्याचप्रकारे त्यांनी दुसऱ्या डावातही तशीच कामगिरी केली. जर, भारतीय संघाने चांगली धावसंख्या उभारली असते तर, या सामन्याच्या अखिरेस वेगळे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता होती, असे विराट कोहली म्हणाला आहे. हे देखील वाचा- Cricketer Rohit Sharma ने पत्नीच्या 33व्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर क्यूट फोटो शेअर करत केले Romantic पद्धतीने विश; Watch Photo

ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 8 विकेट्सने पराभव स्वीकारला लागला होता. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजासमोर लोटागंण घातले. या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 90 धावांचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाच्या संघाने एकहाती विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताची दाणादाण उडवणारे जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.



संबंधित बातम्या

IND vs AUS, 4th Test Pitch Report And Weather Update: चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज की ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज वर्चस्व गाजवतील? सामन्यापूर्वी, मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून

South Africa vs Pakistan, 1st Test Match Live Streaming In India: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिली कसोटी, जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कसे लाइव्ह मॅचचा आनंद घेता येणार

Australia vs India, Boxing Day Test: टीम इंडिया मेलबर्नमध्ये विजयाची हॅट्ट्रिक करू शकेल का? बॉक्सिंग डे कसोटीत सर्वांच्या नजरा असणार या दिग्गज खेळाडूंवर

Virat Kohli Test Record Against Australia: कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची अशी आहे कामगिरी, 'रन मशीन'; च्या आकडेवारीवर एक नजर