दक्षिण आफ्रिकेच्या 'या' वेगवान गोलंदाजाने एका डावात घेतल्या 9 विकेट्स, टीम इंडियाच्या फलंदाजा बनवलं आपलं पहिला शिकार (Video)

काउन्टी चॅम्पियनशिप विभाग एक अंतर्गत खेळल्या गेलेल्या प्रथम श्रेणी सामन्यात एबोटने ही कामगिरी बजावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील काइलीची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

दक्षिण आफ्रिका (South Africa) चा माजी वेगवान गोलंदाज काइल एबोट (Kyle Abbott) याने काऊन्टी क्रिकेटमधील एका मॅचच्या एका डावात 10 पैकी 9 गडी बाद केले. काउन्टी चॅम्पियनशिप विभाग एक अंतर्गत खेळल्या गेलेल्या प्रथम श्रेणी सामन्यात एबोटने ही कामगिरी बजावली. हॅम्पशायरकडून खेळणार्‍या एबोटने साऊथॅम्प्टनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या समरसेटच्या फलंदाजांवर कहर बारसवाला. साऊथॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात एबोटने सोमरसेटविरुद्ध 40 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या. एबोटने भारतीय फलंदाज मुरली विजय (Murali Vijay) याला आपला पहिला शिकार बनवले. विजय शून्यावर बाद झाला. यानंतर यष्टिरक्षक स्टीव्हन डेव्हिस आणि त्यानंतर टॉम अबेल यांना बाद केले. अ‍ॅबॉटने जेम्स हिलद्रे, जॉर्ज बार्लेट, लुईस ग्रेगरी, क्रेग ओव्हरटन, डोमिनिक बेस आणि जोश डेव्ह यांनादेखील परतीचा मार्ग दाखवला.

यापूर्वी या संघासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कार्डिगन कॉनोर याने केली होती. 1996 मध्ये त्याने 28 धावा देऊन 9 बळी घेतले. त्याचा रेकॉर्ड अजूनही अबाधित राहिला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील काइलीची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. एबोटच्या विध्वंसक गोलंदाजीमुळे सॉमरसेटचा संघ पहिल्या डावात 142 धावांवर गडगडला. परिणामी, त्याच्या संघाला पहिल्या डावात 54 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. दुसर्‍या डावात हॅम्पशायरने 8 गडी राखून 176 धावा केल्या असून संघाला एकूण 230 धावांची आघाडी मिळवून दिली. हॅम्पशायरने पहिल्या डावात 196 धावा केल्या होत्या.

एबोटने दक्षिण आफ्रिकेसाठी 11 कसोटी, 28 वनडे आणि 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु 2017 मध्ये कोलपॅक करारावर स्वाक्षरी करून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.



संबंधित बातम्या