South Africa Women vs New Zealand Women, Final Match 1st Inning Scorecard: दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडने दिले 159 धावांचे लक्ष्य, अमेलिया केर आणि ब्रुक हॉलिडे यांची झंझावाती खेळी

न्यूझीलंडकडून अमेलिया केरने 43 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान अमेलिया केरने 38 चेंडूत चार चौकार मारले. अमेलिया केरशिवाय ब्रुक हॉलिडेने 38 धावा केल्या.

Credit: Twitter

South Africa Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team, 2024 ICC Womens T20 World Cup Final Match Scorecard:  2024च्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 साठी अंतिम सामना आज होत आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेची कमान लॉरा वोल्वार्डच्या खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे. आजच्या फायनलची खास गोष्ट म्हणजे या दोन्ही संघांनी अद्याप एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा स्थितीत कोणताही संघ विजेतेपद मिळवेल. त्यामुळे विश्वचषकात इतिहास बदलणार हे नक्की असणार आहे.  दरम्यान या सामन्यात आज साउथ  आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्रररक्षणाचा निर्णय घेतला होता.  (हेही वाचा  -  South Africa Women vs New Zealand Women, Final Toss Update: अंतिम सामन्यात साउथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग 11 )

पाहा पोस्ट -

दरम्यान, स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 16 धावांच्या स्कोअरवर त्यांना पहिला मोठा धक्का बसला. यानंतर सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आणि संघाची धावसंख्या 50 धावांच्या पुढे नेली.

न्यूझीलंड संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 158 धावा केल्या. न्यूझीलंडकडून अमेलिया केरने 43 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान अमेलिया केरने 38 चेंडूत चार चौकार मारले. अमेलिया केरशिवाय ब्रुक हॉलिडेने 38 धावा केल्या.

अयाबोंगा खाकाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने सर्वाधिक दोन बळी घेतले. नॉनकुलुलेको म्लाबा व्यतिरिक्त क्लो ट्रायॉन, अयाबोंगा खाका आणि नादिन डी क्लर्क यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 159 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघांना हा सामना जिंकून विजेतेपद मिळवायचे आहे.

Tags