South Africa Women Beat West Indies Women, 3rd Match Scorecard: टी-20 विश्वषकात दक्षिण आफ्रिका महिला संघाची विजयाने सुरुवात, 10 विकेट राखून वेस्ट इंडिजला नमवलं; येथे पाहा स्कोरकार्ड
त्यांनी या सामन्यात वेस्ट इंडिजचा दहा विकेट राखुन पराभव केला आहे. तत्तपुर्वी, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 118 धावा केल्या. वेस्ट इंडिजसाठी स्टॅफनी टेलरने सर्वाधिक 44 नाबाद धावांची स्फोटक खेळी खेळली.
South Africa Women National Cricket Team vs West Indies Women National Cricket Team: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक सुरु झाला आहे. टी-20 विश्वचषकाचा तिसरा सामना आज दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वषकात विजयाने सुरुवात केली आहे. त्यांनी या सामन्यात वेस्ट इंडिजचा दहा विकेट राखुन पराभव केला आहे.
तत्तपुर्वी, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 118 धावा केल्या. वेस्ट इंडिजसाठी स्टॅफनी टेलरने सर्वाधिक 44 नाबाद धावांची स्फोटक खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान स्टॅफनी टेलरने 41 धावा करताना दोन चौकार आणि एक षटकार लगावला. स्टॅफनी टेलरशिवाय शमीन कॅम्पबेलने 17 धावा केल्या.
तर स्टार अष्टपैलू मॅरिझान कॅपने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नॉनकुलुलेको म्लाबाशिवाय मारिझान कॅपने दोन गडी बाद केले. (हे देखील वाचा: India Women vs New Zealand Women, 4th Match Key Players: न्यूझीलंडला कडवी टक्कर देण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात, सर्वांच्या नजरा असतील 'या' घातक खेळाडूंवर)
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करत 119 धावा फलकावर लावल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकही विकेट न गमावता अवघ्या 17.5 षटकांत लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार लॉरा वोल्वार्डने सर्वाधिक नाबाद 59 धावांची खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान लॉरा वोल्वार्डने 55 चेंडूत सात चौकार मारले. लॉरा वोल्वार्डशिवाय तझमिन ब्रिट्सने नाबाद 57 धावा केल्या.