IND (W) Vs SA (W) 1st T20I 2021: पहिल्याच टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाचा दारुण पराभव; 8 विकेट्स राखून दक्षिण आफ्रिका विजयी

दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध (South Africa Women) सुरु असलेल्या टी-20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात (1st T20I) भारतीय महिला संघाला (India Women) पराभव स्वीकारावा लागला आहे.

IND (W) Vs SA (W) (Photo Credit: BCCI)

दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध (South Africa Women) सुरु असलेल्या टी-20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात (1st T20I) भारतीय महिला संघाला (India Women) पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 130 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 8 विकेट्स राखून सामना जिंकला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळताना एनेके बॉश (66*) आणि कर्णधार सुने लूस (43) या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागेदारी केली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 3 सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर दुखापतग्रस्त असल्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व स्मृति मंधानाकडे सोपवण्यात आले होते. या सामन्यात नाणेफेक गमवल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यातील पहिल्या षटकात स्मृति मंधानाने 2 चौकार ठोकून भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, स्मृति मंधनाने दुसऱ्याच षटकात शबनीम इस्माइलच्या गोलंदाजीवर आपला विकेट्स गमवला. त्यानंतर भारतीय संघ डगमताना दिसला. ज्यामुळे भारतीय संघाला 130 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. भारतीय संघाकडून हरलीन देओल सर्वाधिक 52 केल्या आहेत. हे देखील वाचा-IND vs ENG 5th T20I 2021: विराट कोहली बनला टी-20 किंग, Dawid Malan याची वेगवान हजारी, निर्णायक सामन्यात लागला विक्रमांचा भडीमार

ट्वीट-

भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात डगमगताना दिसला. सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे हात बांधून ठेवले. परंतु, पाचव्या षटकात अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर लूसने सलग 2 षटकार ठोकत आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. त्यानंतर एनेके बॉश आणि लूस या दोघांनी संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे.