SA Beat AFG 3rd Match Scorecard: दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 107 धावांनी केला पराभव, लुंगी एनगिडी आणि कागिसो रबाडाने केली घातक गोलंदाजी

दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करुन अफगाणिस्तानसमोर 316 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण अफगाणिस्तान संघ 43.3 षटकांत फक्त 208 धावांवर ऑलआउट झाला.

SA Team (Photo Credit - X)

Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा तिसरा सामना आज म्हणजेच 21 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (SA vs AFG) यांच्यात कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium, Karachi) खेळला गेला. हा ग्रुप बी चा पहिला सामना होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 107 धावांनी पराभव केला. यासह, दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करुन अफगाणिस्तानसमोर 316 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण अफगाणिस्तान संघ 43.3 षटकांत फक्त 208 धावांवर ऑलआउट झाला.

दरम्यान, आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 28 धावांवर बसला. यानंतर, रायन रिकेल्टन आणि टेम्बा बावुमा यांनी मिळून डावाची सूत्रे हाती घेतली आणि संघाचा धावसंख्या 150 च्या पुढे नेली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 50 षटकांत सहा गडी गमावून 315 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर रायन रिकल्टनने 103 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, रायन रिकेलटनने 106 चेंडूत सात चौकार आणि एक षटकार मारला. रायन रिकेल्टन व्यतिरिक्त कर्णधार टेम्बा बावुमाने 58 धावा केल्या.

दुसरीकडे, स्टार अष्टपैलू मोहम्मद नबीने अफगाणिस्तानला पहिले मोठे यश मिळवून दिले. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद नबी व्यतिरिक्त फजलहक फारुकी, अझमतुल्ला उमरझाई आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

 लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवातही निराशाजनक झाली कारण त्यांचे चार फलंदाज केवळ 50 धावा असतानाच पॅव्हेलियनमध्ये परतले. संपूर्ण अफगाणिस्तान संघ 43.3 षटकांत फक्त 208 धावांवर ऑलआउट झाला. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने 90 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान, रेहमत शाहने 92 चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकार मारला. रेहमत शाह व्यतिरिक्त, अझमतुल्ला उमरझाई आणि रशीद खान यांनी 18-18 धावा केल्या.

त्याच वेळी, स्टार वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा व्यतिरिक्त, लुंगी एनगिडी आणि विआन मुल्डर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Afghanistan Rahmanullah Gurbaz Ibrahim Zadran Sediqullah Atal Rahmat Shah Hashmatullah Shahidi Azmatullah Omarzai Gulbadin Naib Mohammad Nabi Rashid Khan Fazalhaq Farooqi Noor Ahmad South Africa Ryan Rickelton Tony de Zorzi Temba Bavuma Rassie van der Dussen Aiden Markram David Miller Wiaan Mulder Marco Jansen Keshav Maharaj Kagiso Rabada Lungi Ngidi ICC Champion Trophy 2025 Champion Trophy Afghanistan National Cricket Team South Africa National Cricket Team Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team Match Scorecard अफगाणिस्तान रहमानउल्ला गुरबाज इब्राहिम झद्रान सेदिकुल्लाह अटल रहमत शाह हशमतुल्ला शाहिदी अजमतुल्ला ओमरझाई गुलबद्दीन नायब मोहम्मद नबी रशीद खान फजलहक फारुकी नूर अहमद दक्षिण आफ्रिका रायन रिकेल्टन टोनी डी झोर्झी टेम्बा बावुमा मार्क्स डेविड मार्क्स डेविड ए ड्यूमा राशीद खान. मिलर विआन मुल्डर मार्को जानसेन केशव महाराज कागिसो रबाडा लुंगी एनगिडी चॅम्पियन ट्रॉफी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ सामना स्कोअरकार्ड


Share Now