Sourav Ganguly Biopic: सौरव गांगुली यांच्या जीवनावर येणार चित्रपट, 'हा' अभिनेता साकारू शकतो दादाची व्यक्तिरेखा
भारतीय संघातील अनेक माजी खेळाडूंच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवविण्यात आले आहे. सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि मोहम्मद अझरूद्दीन (Mohammad Azharuddin) यांच्यानंतर आता उत्कृष्ट कर्णधारांपैकी एक सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्याही जीवनावर आधारीत चित्रपट येत आहे.
भारतीय संघातील अनेक माजी खेळाडूंच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवविण्यात आले आहे. सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि मोहम्मद अझरूद्दीन (Mohammad Azharuddin) यांच्यानंतर आता उत्कृष्ट कर्णधारांपैकी एक सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्याही जीवनावर आधारीत चित्रपट येत आहे. सौरव गांगुली यांनी या प्रकल्पाला होकार दिला आहे. वृत्तानुसार, हा एक मोठा बजेट चित्रपट असणार आहे. त्याच्या प्रॉडक्शनमध्ये 200 ते 250 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, सौरव गांगुली यांच्या बायोपिकमध्ये बॉलिवूडचा आवडता अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारू शकतो.
न्यूज 18 बांगलाला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सौरव म्हणाले की, "हो, बायोपिकसाठी मी होकार दिला आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होईल, पण आत्ता दिग्दर्शकाचे नाव सांगणे शक्य नाही. सर्व फायनल होण्यासाठी अजून थोडा वेळ आहे". प्रॉडक्शन हाऊसने सौरव गांगुलीची भूमिका पडद्यावर घेणार्या अभिनेत्यावरही निर्णय घेतला आहे. या भूमिकेसाठी रणबीर कपूर हा अव्वल दावेदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच आणखी दोन कलाकारांचादेखील विचार केला जात आहे. हे देखील वाचा- ICC Women’s ODI Rankings: मिताली राजला धक्का देत Stafanie Taylor बनली आयसीसी नंबर-1 वनडे फलंदाज
याआधीही सौरव गांगुली यांच्या बायोपिकसंदर्भातील बातम्या अनेकदा प्रसारमाध्यमात झळकल्या होत्या. त्यावेळी सौरव गांगुली यांनी कोणताच अहवाल स्वीकारला नव्हता. परंतु यावेळी स्वत: बीसीसीआय अध्यक्षांनी बायोपिकचे काम सुरू असल्याची माहिती दिली आहे. प्री-प्रॉडक्शनचे काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. सध्या ही बाब गोपनीय ठेवली जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)