BCCI अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुली याने माजी हरभजन सिंह याची मागितली मदत, हे आहे कारण
गांगुलीने देखील भज्जीच्या ट्विटला उत्तर देण्यास उशीर न करता लगेचच हरभजनची मदत मागितली. सौरव बीसीसीआय अध्यक्ष होणार यांच्याबाबत घोषणा झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला भारतीय क्रिकेट मंडळ, बीसीसीआयचा नवा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. पण, अधिकृत घोषणा 23 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. या पदासाठी सोमवारी सौरवने अर्ज दाखल केला होता. बीसीसीआय अध्यक्षपदासाठी इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नसल्याने गांगुली यांची मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणे अपेक्षित होते. सौरव बीसीसीआय अध्यक्ष होणार यांच्याबाबत घोषणा झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली आहे. चाहत्यांपासून माजी आणि विद्यमान क्रिकेटपटूंनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. माजी सहकारी हरभजन सिंह याचे नावही या मालिकेत जोडले गेले आहे. (बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची निवड)
टर्बनेटर हरभजनने ट्वीट करून सौरवचे बीसीसीआय अध्यक्ष म्हणून अभिनंदन केले. त्याने लिहिले, 'तुम्ही एक नेता आहात ज्याने इतर लोकांना नेते बनण्यासाठी प्रोत्साहित केले आणि मार्ग दाखविला. बीसीसीआय अध्यक्ष झाल्याबद्दल खूप-खूप अभिनंदन." गांगुलीने देखील भज्जीच्या ट्विटला उत्तर देण्यास उशीर न करता लगेचच हरभजनची मदत मागितली. भज्जीचे ट्विट रिट्वीटमध्ये गांगुलीने लिहिले की, "धन्यवाद भज्जी, जसे तुम्ही एका टोकापासून गोलंदाजी करून टीम इंडियाला जिंकण्यास मदत केली त्याप्रमाणे मला तुमची मदत आवश्यक आहे."
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही ट्विटरवरून गांगुलीचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले की, 'बीसीसीआय अध्यक्षपदी निवडल्याबद्दल 'दादी' तुम्हाला अभिनंदन. मला खात्री आहे की तुम्ही नेहमीप्रमाणे भारतीय क्रिकेटची सेवा करत रहाल. पदभार स्वीकारनाऱ्या नवीन टीमचे अनेक अभिनंदन.' सचिनने आपल्या ट्विटमध्ये गांगुलीसाठी 'दादा' ऐवजी 'दादी' हा शब्द वापरला होता कारण तो प्रेमळपणे त्याला 'दादी' म्हणतो. याचा खुलासा सचिनने स्वतः एका मुलाखतीत केला आहे.
दरम्यान, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी गांगुलीच्या बाजूने निणर्य लावण्यात मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे असल्याच्या चर्चा सुरु आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुढील काही महिन्यांत भारतीय क्रिकेटमध्ये सर्व काही सामान्य होईल अशी अपेक्षा गांगुलीने व्यक्त केली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याप्रमाणेच तेही भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेतील अशी आशा गांगुलीने व्यक्त केली.