IPL Auction 2025 Live

Smriti Mandhana ची तुफानी खेळी, टी-20 क्रिकेटमध्ये केला 'हा' मोठा करिष्मा

आपल्या शानदार फलंदाजीने ती सर्वांना प्रभावित करू शकली. तिच्या झंझावाती खेळीमुळे टीम इंडियाला (Team India) सामना जिंकण्यात यश आले.

Smriti Mandhana (Photo credit - Twitter)

Smriti Mandhana New Record: महिला टी-20 विश्वचषक 2023 (Women's T20 World Cup 2023) मध्ये, भारताने डकवर्थ-लुईस पद्धतीने आयर्लंडचा पाच धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताकडून स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) शानदार खेळ दाखवला. आपल्या शानदार फलंदाजीने ती सर्वांना प्रभावित करू शकली. तिच्या झंझावाती खेळीमुळे टीम इंडियाला (Team India) सामना जिंकण्यात यश आले. आता सर्वोत्तम खेळीच्या जोरावर तिने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेवूया... (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test: इंदूरच्या होळकर स्टेडियमवर कांगारू संघ येणार अडचणीत, टीम इंडियाच्या नावावर आहे शानदार रेकाॅर्ड)

मंधानाने केली अप्रतिम कामगिरी

स्मृती मंधानाने आयर्लंडविरुद्धच्या डावाच्या सुरुवातीलाच धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने 56 चेंडूत 9 चौकार आणि तीन लांब षटकार मारले आणि 87 धावांची अप्रतिम खेळी केली. ही तिची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी ठरली. याआधी न्यूझीलंडविरुद्ध तिची सर्वोत्तम धावसंख्या 86 होती.

मिताली राजचा मोठा विक्रम मोडला

महिला टी-20 विश्वचषक 2023 चे आयोजन दक्षिण आफ्रिकेत होत आहे. स्मृती मंधाना ही भारताकडून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर सर्वात मोठी खेळी खेळणारी खेळाडू ठरली आहे. तिने मिताली राजचा विक्रम मोडला आहे. मितालीने 2018 मध्ये 78 धावांची खेळी केली होती. मंधानाने भारतासाठी 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 22 अर्धशतकांसह 2800 धावा केल्या आहेत. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, ती सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिच्या पुढे न्यूझीलंडची सुझ बेट्स आहे, जिने 26 अर्धशतके केली आहेत.

सामन्यानंतर केले हे वक्तव्य

आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर स्मृती मंधाना म्हणाली की, ही माझी आतापर्यंतची सर्वात कठीण खेळी आहे. खेळपट्टी अवघड होती पण ते ज्या वेगाने गोलंदाजी करत होते आणि जोराचा वारा यामुळे परिस्थिती अधिक आव्हानात्मक होती. ती पुढे म्हणाली की, आम्ही एकमेकांना (ओपनिंग पार्टनर शफाली वर्मासह) सांगत होतो की, आम्ही क्रीजवर राहण्याचा आणि आमची लय राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.