ICC Women's World Cup 2022: विश्वचषकपूर्वी Smriti Mandhana हीची दमदार फलंदाजी, न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात विजयानंतर केलं मोठं वक्तव्य
ICC Women's World Cup 2022: न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय महिला संघाच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात विजयाची शिल्पकार ठरलेली स्टार सलामी फलंदाज स्मृती मंधाना हिने म्हटले की मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा विजय न्यूझीलंडमध्ये आगामी विश्वचषक स्पर्धेपूर्वी संघाला आत्मविश्वास देईल.
ICC Women's World Cup 2022: न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय महिला संघाच्या (Indian Women's Team) अंतिम एकदिवसीय सामन्यात विजयाची शिल्पकार ठरलेली स्टार सलामी फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने म्हटले की मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा विजय न्यूझीलंडमध्ये (New Zealand) आगामी विश्वचषक (World Cup) स्पर्धेपूर्वी संघाला आत्मविश्वास देईल. किवी दौऱ्यावर एकमेव टी-20 सामन्यासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी गमावली. याशिवाय महिला क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध अंतिम एकदिवसीय सामन्यात मंधाना लयीत परतल्याने आश्वस्त दिसली. गुरुवारी, स्मृतीने सर्वाधिक 84 चेंडूंत नऊ चौकारांसह 71 धावा केल्या आणि जॉन डेव्हिस ओव्हलवर भारताच्या सहा गडी राखून विजय निश्चित केला. (Women’s CWC 2022: महिला विश्वचषकपूर्वी ICC ची महत्वाची घोषणा; आता किमान 9 खेळाडूंसह मैदानात उतरू शकणार, पण आहे ‘ही’ अट!)
तिच्याशिवाय, हरमनप्रीत कौरने महत्त्वपूर्ण 63 धावा केल्या आणि कर्णधार मिताली राजने नाबाद 57 धावा करत 252 धावांचा पाठलाग करून चार षटके शिल्लक असताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. “मला वाटते की आमच्या गोलंदाजांनी त्यांना 250 पर्यंत रोखून उत्कृष्ट कामगिरी केली. फलंदाजीसाठी विकेट चांगली होती आणि सर्व फलंदाजी युनिटने आश्चर्यकारकपणे योगदान दिले - मी, हॅरी (हरमनप्रीत) दी आणि मिताली (राज) दी,” सामनाोत्तर सादरीकरण समारंभात 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आलेली स्मृती म्हणाली. तसेच मॅनेज्ड आयसोलेशन अँड क्वारंटाईन (MIQ) मध्ये अधिककाळ राहिलेली स्मृतो आपल्या खेळाबद्दल म्हणाली, “सुरुवातीला पहिले 10-15 चेंडू कठीण होते, मी फलंदाजी कशी करायची हेच विसरली. जितका जास्त वेळ मी विकेटवर घालवला तितका वेळ मला अंगवळणी पडला. विश्वचषकापूर्वी मला थोडी निक सापडली याचा मला आनंद आहे.”
टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1 ने गमावली असली तरी, स्मृतीला असे वाटले की या मालिकेने विश्वचषकपूर्वी त्यांची चांगली तयारी केली आहे. दरम्यान भारतीय संघ आता 6 मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्यापूर्वी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषक सराव सामना खेळतील.