Smriti Mandhana New Record: स्मृती मानधनाने रचला इतिहास, न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून मिताली राजचा सर्वात मोठा विक्रम काढला मोडीत

मानधनाचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील 8 वे शतक आहे. तिने मिताली राजचा सात शतकांचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे.

Smriti Mandhana (Photo Credit - X)

India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team: स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला आहे. स्मृती मानधना ही भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी खेळाडू ठरली आहे. मानधनाचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील 8 वे शतक आहे. तिने मिताली राजचा सात शतकांचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. स्मृती मंधानाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 100 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 122 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार मारले. (हे देखील वाचा: IND W vs NZ W 3rd ODI 2024 Scorecard: भारताने न्यूझीलंडचा 6 गडी राखून केला पराभव, मालिका 2-1 ने केली नावावर; स्मृती मानधनाचे शानदार शतक)

भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या महिला खेळाडू:

स्मृती मानधना- 8 शतके (88 सामने)

मिताली राज- 7 शतके (232 सामने)

हरमनप्रीत कौर- 5 शतके (135 सामने)

टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली

स्मृती मानधानाचे शतक आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद 59 धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा सहा गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. भारतासमोर विजयासाठी 233 धावांचे लक्ष्य होते, भारतीय संघाने 44.2 षटकात 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif