महाराष्ट्राची स्मृती मंधाना महिला क्रिकेटपटूंच्या ICC क्रमवारीत अव्वल
मराठमोळ्या स्मृती मंधाना(Smriti Mandhana) या महिला क्रिकेटपटूने आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे.
मराठमोळ्या स्मृती मंधाना(Smriti Mandhana) या महिला क्रिकेटपटूने आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या महिला क्रिकेट संघाने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये 2-1 अशी आघाडी मिळवली होती. स्मृती या मालिकेची 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरली होती. खेळातील सातत्यामुळे स्मृतीला आयसीसी कर्मवारीमध्ये अव्वल स्थान मिळवण्याचा मार्ग सुकर झाला. स्मृती भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर आहे. India Vs New Zealand Womens ODI: भारतीय महिला संघाचा मालिका विजय; स्मृति मंधाना ठरली Player Of The Tournament
स्मृतीने 2018 पासून आतापर्यंत 15 एकदिवसीय सामन्यांत दोन शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली. आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने ( 751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू मेग लॅनिंग 76 गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज पाचव्या स्थानावर आहे.