Shubman Gill आणि Rohit Sharma मध्ये मतभेद? इंस्टाग्रामवर केले अनफॉलो? भारतात परतण्याचे 'हे' मोठे कारण आले समोर
Rohit Sharma And Shubman Gill (Photo Credit - Twitter)

Shubman Gill vs Rohit Sharma: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) ग्रुप स्टेजमधील भारताचा शेवटचा सामना आज कॅनडासोबत (IND vs CAN) होणार आहे. भारताने याआधीच अमेरिका, पाकिस्तान आणि आर्यंलडचा पराभव करुन सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता फ्लोरिडा येथे खेळवला जाईल. त्यानंतर भारतीय संघ सुपर 8 सामन्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना होईल. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन गिलला (Shubman Gill) अनुशासनहीनतेमुळे भारतात पाठवले जात आहे. रोहित शर्मासोबतच्या (Rohit Sharma) त्याच्या मतभेदाच्या चर्चेदरम्यान त्याच्या मायदेशी परतण्यामागचे एक मोठे कारण समोर आले आहे. (हे देखील वाचा: T20 WC 2024 Super 8 Scenario: भारतासह सहा संघ सुपर 8 साठी पात्र, या 10 संघांना मिळाले नारळ; जाणून घ्या संपूर्ण समीकरण)

गिलचे भारतीय संघ सोडून साइड बिझनेसवर जास्त लक्ष

रिपोर्ट्सनुसार शुभमन गिल भारतीय संघासोबत वेळ घालवत नसुन तो आपल्या साइड बिझनेसवर जास्त लक्ष देत आहे. तसेच, भारतीय संघासोबत तो प्रवासही करत नाही आहे. 9 जूनला झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान, राखीव खेळाडू म्हणून रिंकू सिंह, आवेश खान आणि खलील अहमद भारतीय संघांला मैदानात चीयर करताना दिसुन आले पण तिथे गिल नव्हता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

इंस्टाग्रामवर रोहित शर्माला केले अनफॉलो

तसेच दुसरीकडे अशी ही बातमी येत आहे की शुभमन गिलने रोहित शर्माला इंस्टाग्रामवरु अनफॉलो केले आहे. पण, यात किती तथ्य आहे? याची पुष्टी होऊ शकली नाही. दरम्यान, शुभमन गिलसोबत वेगवान गोलंदाज आवेश खानलाही संघातून मुक्त करण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे.