2019 मध्ये विराट सेनेतील हे '5' क्रिकेटपटू अडकतील विवाहबंधनात!
या तगड्या खेळाडूंच्या खांद्यावर भारतीय क्रिकेटच्या वर्तमान आणि भविष्याची धूरा आहे.
भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) तरुण, उमद्या, हँडसम क्रिकेटपटूंची काही कमी नाही. या तगड्या खेळाडूंच्या खांद्यावर भारतीय क्रिकेटच्या वर्तमान आणि भविष्याची धूरा आहे. मैदानावर जबरदस्त खेळी करणारी ही वीरसेना मैदानाबाहेरही अनेक तरुणींना घायाळ करते. 2019 मध्ये 'हे' दिग्गज क्रिकेटपटू होऊ शकतात निवृत्त !
मुंबईचा 23 वर्षीय श्रेयस अय्यर खेळात हळूहळू सुधारणा करत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ओळख बनवत आहे. हँडसम श्रेयस मुलींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्याची खेळाबद्दलची निष्ठा आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी पाहता लवकरच तो क्रिकेट विश्वात चांगली कामगिरी करेल, यात शंका नाही.
जसप्रीत बुमराह
जसप्रीतची गोलंदाजी सर्वश्रूत आहे. त्याच्या जबरदस्त गोलंदाजीने तो जगातील सर्वश्रेष्ठ डेथ ओव्हर फलंदाजांपैकी एक असल्याचे सिद्ध केले आहे. 24 व्या वर्षी त्याने संपादन केलेले यश आणि त्याचा जबरदस्त लूक यामुळे जसप्रीतची मुलींमध्ये क्रेझ आहे. मैदानात तो खेळत असताना त्याचे गर्ल फॅन फॉलोईंग लक्षात येते.
मनिष पांडे
या क्रमवारीत मनिष तिसऱ्या स्थानावर आहे. याचेही फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. सरळ आणि लाजाळू स्वभावाचा मनिषची मुलींमध्ये क्रेझ आहे.
हार्दिक पांड्या
बडोद्याचा 24 वर्षीय ऑलराऊंडर हार्दिक पांड्या क्रिकेटमधील मोठा स्टार आहे. हार्दिक दमदार फलंदाजीसह जबरदस्त गोलंदाजीही करतो. त्याच्या वेगवेगळ्या हटके लूक्समुळे तो कायम चर्चेत असतो.
केएल राहुल
बँगलोरचा हँडसम आणि स्मार्ट क्रिकेटपटू कोणत्याही मॉडेलपेक्षा कमी नाही. राहुल क्रिकेटसोबतच त्याच्या लूक्स आणि स्टाईलबाबतीतही विशेष जागृक असतो आणि त्याचा हाच अंदाज मुलींना भावतो.