Video: 'कोच मिसबाह उल हक यांना ग्रूम करणार?' शोएब मलिक याने पत्रकाराच्या प्रश्नाचे दिले हास्यास्पद उत्तर
बांग्लादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 मॅचनंतर पत्रकाराने शोएब मलिककडे याबाबत जाब विचारला. यावर शोएब म्हणाला की शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही. जर त्यांना जबाबदारी मिळाली असेल तर त्यांना रात्रभरात निकाल मिळणार नाही.
पाकिस्तानचा (Pakistan) अनुभवी अष्टपैलू शोएब मलिक (Shoaib Malik) संघात परतला आहे. बांग्लादेशविरुद्ध (Bangladesh) झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला. 37-वर्षीय मालिकेला मात्र अलीकडच्या काळात संघातून बाहेर करण्यात आले होते. 1999 मध्ये पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या मलिकने जून 2019 मध्ये अखेरचा वनडे सामना खेळला होता तर 2015 मध्ये पाकिस्तानसाठी टेस्ट सामना खेळला. दुसरीकडे, पाकिस्तानचे प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता मिसबाह-उल-हक (Misbah-ul-Haq) यांनी 2001 मध्ये आंतरराष्ट्रीय, तर 2007 मध्ये मलिकच्या नेतृत्वात टी-20 मध्ये पदार्पण केले होते. आणि आता एकीकडे मालिक खेळाडू म्हणून, तर मिसबाह प्रशिक्षक म्हणून पाकिस्तानचे नेतृत्व करत आहे. मिसबाह प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांच्यावर सतत टीका केली जाते. बांग्लादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 मॅचनंतर पत्रकाराने मलिककडे याची विचारपूस केली आणि त्याला जाब विचारला.
मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत शोएबला एका पत्रकाराने धरले आणि पाकिस्तानच्या प्रशिक्षक मिस्बाहला ग्रूम करणार का असे विचारले. "आपण म्हटले आहे की युवा खेळाडूंना ग्रुम करण्याची जबाबदारी वरिष्ठ खेळाडूंची असते. आपण कोचपेक्षाही सिनिअर आहेत, तर तुम्ही तुमच्या प्रशिक्षकालाही ग्रूम करणार का?” पत्रकाराने मलिकला विचारले. यावर शोएब म्हणाला की शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही. जर त्यांना जबाबदारी मिळाली असेल तर त्यांना रात्रभरात निकाल मिळणार नाही. "जगात असा कोणीही नाही जो असे म्हणू शकतो की त्याने सर्व काही शिकले आहे. जेव्हा सचिन तेंडुलकर हे सांगू शकत नव्हता किंवा असे बरेच लोक आहेत जे हे सांगू शकत नाही. शिकणे कधीच संपत नाही. शिकण्याची प्रक्रिया आहे. आपण एखाद्याच्या मागे पटकन पडतो. आपल्याला रात्रभरात निकाल हवा असतो, आपण जरा थांबायला हवे." पाहा मलिकने पत्रकाराला प्रकारपणे दिलेल्या उत्तराचा हा व्हिडिओ:
गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून पहिला सामना खेळत मलिकने 5 चौकार मारत पदार्पण करणाऱ्या अहसान अलीसह तिसर्या विकेटसाठी 46 धावांची खेळी केली. अहसानने 32 चेंडूत 4 चौकारांसह 36 धावा केल्या.आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या मलिकने विक्रमी 112 सामन्यात 2321 धावा केल्या आहेत.