Coronavirus: शोएब अख्तरने भारताकडे 10 हजार व्हेंटिलेटर देण्याची केली विनंती, भारतीय यूजर्स म्हणाले-'चीनला विचारा'

एका यूजरने लिहिले की, "कोरोना व्हायरसविरूद्ध लढ्यासाठी चीन-पाकिस्तान कसोटी मालिका चांगली कल्पना आहे."

शोएब अख्तर (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसचा (Coronavirs) होणार प्रादुर्भाव पाहता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) सरकारला या कठीण काळात दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याची विनंती केली आहे. अख्तर म्हणाले की जर भारताने आपल्यासाठी 10,000 व्हेंटिलेटर बनवले तर आयुष्यातली ही छोटी मदत आम्ही कधीही विसरणार नाही. भारत-पाकिस्तानमध्ये कोविड-19 (COVID-19) चा कहर कायम आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान इतर देशांकडून मदतीची विनंती करत आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरचा मृत्यूही झाला आहे. शोएबने संकट संपल्यावर निधी गोळा करण्यासाठी दोन्ही देशांत क्रिकेट मालिका आयोजित करण्याचाही प्रस्ताव ठेवला. शोएब म्हणाला की, दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका झाली पाहिजे जेणेकरुन कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक निधी उभा करता येईल.पहिल्यांदा जेव्हा दोन्ही देशांमध्ये अशी मालिका खेळली जाईल आणि शेवटी जो काही निधी येईल तो दोन देशांमध्ये समान वितरित केले जाईल. शोएबच्या निवेदनावर सोशल मीडियावर भारतीय यूजर्सने त्याची क्लास घेतली आणि चीनकडून मदत मागण्यास सांगितले. (Coronavirus संकटात फंड गोळा करण्यासाठी शोएब अख्तरने ठेवला भारत विरुद्ध पाकिस्तान मालिकेचा प्रस्ताव)

एका यूजरने लिहिले की, “मित्र शोएब अख्तर, भारताने 10 हजार पाकिस्तानी सैनिक दिले, तुला ते आठवत नाही. असा विनोद पुन्हा करु नका." दुसर्‍याने लिहिले, "शोएब, तुम्ही हा प्रस्ताव आपल्या जवळचा मित्र चीनला द्यावा. कोरोना व्हायरसविरूद्ध लढ्यासाठी चीन-पाकिस्तान कसोटी मालिका चांगली कल्पना आहे." शोएबचा हा व्हिडिओ पाहा:

पाहा शोएबच्या प्रस्तावावर भारतीय यूजर्सच्या प्रतिक्रिया:

त्या बदल्यात तुम्ही 10 हजार दहशतवादी भारताला देणार?

ड्रामेबाज आले

काफ़िरांकडून व्हेंटिलेटर कसे मागतात

अख्तरचे ट्विट वाचल्यानंतर मला व्हेंटिलेटरची आवश्यकता

व्हेंटिलेटरची गरज टाळा

चीनला प्रस्ताव द्यावा

दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे मागील अनेक वर्षे क्रिकेट सामने खेळले गेले नाहीत. दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धेत आमने-सामने येतात. दुसरीकडे, भारतात कोरोनाच्या संसर्गाचे सुमारे 5000 लोक बळी पडले आहेत तर 160 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.