IND vs WI 3rd ODI: शिखर धवनच्या संघाने केली अप्रतिम कामगिरी, 39 वर्षांनंतर वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत केले क्लीन स्वीप

शुभमन गिलच्या नाबाद 98 धावा आणि फिरकीपटू युझवेंद्र चहल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर भारताने क्वीन्स पार्क ओव्हलवर गुरुवारी पावसाने ग्रासलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत वेस्ट इंडिजचा 119 धावांनी पराभव केला.

Team India (Photo Credit - Twitter)

शिखर धवनच्या (Shikhar Dhwan) नेतृत्वाखालील भारतीय संघाने (Team India) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Match) शेवटचा सामना 119 धावांनी जिंकून इतिहास रचला. 1983 पासून, भारताने कॅरेबियन भूमीवर द्विपक्षीय एकदिवसीय सामने खेळण्यास सुरुवात केली, तेव्हापासून या मालिकेपर्यंत एकही भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध (WI) एकदिवसीय सामन्यांमध्ये क्लीन स्वीप करू शकला नाही. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 39 वर्षांनंतर एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा धुव्वा उडवणारा पहिला भारतीय संघ ठरला आहे. शुभमन गिलच्या नाबाद 98 धावा आणि फिरकीपटू युझवेंद्र चहल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर भारताने क्वीन्स पार्क ओव्हलवर गुरुवारी पावसाने ग्रासलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत वेस्ट इंडिजचा 119 धावांनी पराभव केला.

Tweet

याआधी भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन किंवा त्याहून अधिक एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कधीही क्लीन स्वीप करू शकला नव्हता. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध क्लीन स्वीप केले आणि बुधवारी वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव करून इतिहास रचला. (हे देखील वाचा: Women's ODI World Cup: महिला वनडे विश्वचषक 2025 चे यजमान भारताला, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केला आनंद व्यक्त)

भारताचा सलामीवीर शिखर धवन हा वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्लीन स्वीप करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. एका कॅलेंडर वर्षात संघाला दुहेरी व्हाईटवॉश करणारा भारत हा तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी झिम्बाब्वे आणि बांगलादेशने हा पराक्रम केला आहे.