कोरोना व्हायरस संकट दूर झाल्यावर शिखर धवन याला रविंद्र जडेजा याच्यासोबत करायचंय 'हे' काम, पाहा

भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या इंस्टाग्राम पेजवर घोड्यांसह आणखी एक चित्र शेअर केले. जडेजाचा टीम इंडिया सहकारी आणि भारताचा सलामी फलंदाज शिखर धवन याने या पोस्टला प्रतिसाद दिला आणि सांगितले की, जेव्हा कोरोना व्हायरसवर देश जेव्हा नियंत्रण मिळवेल तेव्हा हे दोन क्रिकेटर्स घोडेस्वारी करतील.

रवींद्र जडेजा आणि शिखर धवन (Photo Credit: Instagram/Getty)

भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) घोडेस्वारीची आवड त्यांच्या चाहत्यांपासून लपलेली नाही. सौराष्ट्रचा फलंदाज आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ मीडियावर शेअर करत असतो ज्यामध्ये तो घोडेस्वारी करण्याचे कौशल्य दाखवत आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत आणि भारतीय क्रिकेटपटू घरी कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवत आहे. आणि क्रिकेटशिवाय जडेजाला घोडेस्वारीसाठी चांगला वेळ मिळत आहे. मंगळवारी जडेजाने आपल्या इंस्टाग्राम पेजवर घोड्यांसह आणखी एक चित्र शेअर केले, ते म्हणाले की, "माझा घोडा मला स्वतःबद्दल जाणून घेण्याची आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट शिकवतो." जडेजाचा टीम इंडिया सहकारी आणि भारताचा सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने या पोस्टला प्रतिसाद दिला आणि सांगितले की, जेव्हा कोरोना व्हायरसवर देश जेव्हा नियंत्रण मिळवेल तेव्हा हे दोन क्रिकेटर्स घोडेस्वारी करतील. (Coronavirus लॉकडाउन काळात सुरेश रैना आणि मुलगी ग्रासियाने घरातच लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद, पाहा व्हिडिओ)

धवनने जडेजाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले की, “जेव्हा देशात कोरोना महामारी नियंत्रित होईल तेव्हा ते दोघे एकत्र घोडेस्वारी करूया.” दरम्यान, काही महिन्यांपूर्वी धवनने स्वतःचा घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यामधून त्याचा घोडेस्वारी करण्याचा छंद समोर आला होता.

 

View this post on Instagram

 

My horse teaches me everything that I need to know about myself. #loveforever #mystyleofliving

A post shared by Ravindra Jadeja (@royalnavghan) on

कोरोना व्हायरसमुळे देशात सध्या 21 दिवस लॉकडाउन सुरू आहे, जो 14 एप्रिलपर्यंत सुरू राहील. या महामारीमुळे आयपीएल 2020 देखील 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले असून या टी-20 लीगचे यंदा आयोजन संशयास्पद दिसत आहे. धवनने नुकताच चाहत्यांसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो पत्नी आयशा आणि मुलगा जोरावर सोबत मस्ती करताना दिसत आहे. बॉलीवूडमधील एका चित्रपटाच्या 'ढल गया दिन, हो गई रात' या गाण्यावर पत्नी आयशासोबत डान्सदेखील केला. लॉकडाउन दरम्यान अनेक क्रिकेटपटू घरी वेळ कसा घालवात आहेत हे सामायिक करीत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now