Video: शिखर धवन, हार्दिक पंड्या यांनी 'बोअरिंग' रिहॅब सत्राला बनवले रोचक, पाहून तुम्हीही लागलं नाचयाला

हार्दिक पंड्या, इशांत शर्मा आणि शिखर धवन यांचे सध्या बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पुनर्वसन सुरू आहे. धवनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाची त्रिमूर्ती रिहॅबच्या वेळी मजा करताना दिसत आहेत. यहा के हम सिकंदर! व्हिडिओमध्ये 'यहां के हम सिकंदर...' हे गाणे सुरू आहे, ज्यावर पंड्या व्यायामासह नाचताना दिसत आहेत.

शिखर धवनने ईशांत शर्मा आणि हार्दिक पंड्यासोबत डान्सचा व्हिडिओ शेअर केला (Photo Credits: Instagram | Screengrab)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सध्याच्या दौऱ्यावर टी-20 मालिका जिंकून आणि नंतर वनडे मालिका गमावल्यानंतर आता भारतीय संघ (Indian Team) कसोटी मालिकेची तयारी करीत आहे. दोन सामन्यांची टेस्ट मालिका 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे आणि टीम इंडियाचे मुख्य खेळाडूंना दुखापतीमुळे मालिकेला मुकावे लागणार आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya), इशांत शर्मा आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांचे सध्या बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) पुनर्वसन सुरू आहे. धवन आणि हार्दिकला टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे, तर इशांतचे नाव शामिल केले असले तरीही फिटनेस टेस्ट पास केल्यावरच तो न्यूझीलंडला जाऊ शकेल. धवनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाची त्रिमूर्ती रिहॅबच्या वेळी मजा करताना दिसत आहेत. (IND vs NZ 2020: न्यूझीलंड XI विरुद्ध टूर सामन्यात भारताची खराब फलंदाजी; पृथ्वी शॉ, शुभमन गिल फेल; हनुमा विहारी ने ठोकले शतक)

व्हिडिओ शेअर करताना धवनने लिहिले की, 'कोण म्हणतो की रिहॅब कंटाळवाणे आहे? यहा के हम सिकंदर! व्हिडिओमध्ये 'यहां के हम सिकंदर...' हे गाणे सुरू आहे, ज्यावर पंड्या व्यायामासह नाचताना दिसत आहेत. दिल्लीकडून रणजी सामना खेळताना इशांत जखमी झाला, तर पंड्यावर नुकतीच परत शस्त्रक्रिया झाली. विश्वचषक दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक सप्टेंबरपासून टीम इंडियातून बाहेर आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर हार्दिक पुनरागमन करेल असे मानले जात होते, मात्र पूर्ण फिट नसल्याने त्याची निवड झाली नाही. पाहा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Who said rehab is boring? 🤣 Yahaan ke hum sikander! @hardikpandya93 @ishant.sharma29

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे तसेच बरेच लोक यावर प्रतिक्रियाही देत आहेत. यावरील एका टिप्पणीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. खलील अहमदने या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले की, "आणखी एक व्यक्ती लवकरच तुमच्यामध्ये सामील होणार आहे.' यावर धवनने लिहिले केले, 'तुलाही दुखापत झाली आहे का?' धवनला मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत दुखापत झाली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now