वेस्ट इंडिजच्या कॉट्रेलचा Lt Colonel एमएस धोनी याला ‘शेल्डन सॅल्यूट’; प्रेरणादायी म्हणून केला सम्मान, पहा हे (Tweet)
कॉटरेल याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसाठी आपला प्रसिद्ध 'शेल्डन सॅल्यूट' देखील ठोकला आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने आपल्या मैदानावरील खेळीसह मैदानाबाहेरील कृत्याने चाहत्यांनी मनं जिंकली आहे. भारतात आणि अन्य देशात त्याचे अनेक चाहते आहे. विश्वचषकमधल्या त्याच्या मंद खेळीनंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोर पकडू लागल्या. आणि आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जात धोनीने भारतीय सैन्यासोबत दोन महिने व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी या काळात काश्मीरमध्ये गस्त घालणार आहे. धोनीच्या या कृत्याचे पुन्हा एकदा सर्वांना त्याच्या प्रेमात पडले आहे. वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा एक आर्मी जवान देखील धोनीचं देशाच्या सैन्यासाठी प्रेमपाहून त्याच्यावर प्रभावित झाला आहे. आणि तो दुसरा कोणी नव्हे तर विंडीजचा 'आर्मीमॅन' शेल्डन कॉटरेल (Sheldon Cotterell) आहे. (धोनीला सुरक्षेची गरज नाही, देशावासियांचे संरक्षण करण्यास महेंद्रसिग धोनी समर्थ- लष्कर प्रमुख बिपिन रावत)
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत कॉटरेलचे विकेट घेतल्यानंतर सॅल्यूट करून सेलेब्रेशन करणे हा चर्चेचा विषय बनला होता. कॉटरेल हा स्वतः वेस्ट इंडिजच्या सैन्यदलाचा भाग आहे. आणि त्यांच्या समर्थनार्थ आपण सॅल्यूट ठोकत असल्याचे त्याने स्पष्ट केले. एका देशाच्या सैन्य जवानांकडून दुसऱ्या जवानाचे कौतुक केले गेले आहे. कॉटरेल याने आपल्या ट्विटरद्वारे धोनीच्या सैन्य प्रेम आणि आदराचे भरभरून कौतुक केले आहे. कॉटरेल म्हणाले की, "हा माणूस क्रिकेटच्या मैदानात एक प्रेरणास्थान आहे. पण तो देशभक्त आणि कर्तव्य पलीकडे आपल्या देशाला देणारा माणूस आहे." तो इथेच थांबला नाही आणि दुसऱ्या ट्विटमध्ये एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत म्हणाला की, "मी हा व्हिडिओ माझ्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर केला आहे कारण त्यांना माहित आहे मला सन्मानाबद्दल कसे वाटते. पण पती आणि पत्नी यांच्यातील तो एक क्षण देशासाठी आणि आपल्या भागीदारासाठी प्रेरणादायक प्रेमाचे वास्तव दर्शवतो. तुम्ही देखील याचा आनंद लुटा जसा मी घेतला."
कॉट्रेल हा क्रिकेटर असण्यासोबतच वेस्ट इंडिंजच्या डिफेन्स फोर्सचाही भाग आहे. आपल्या प्रत्येक विकेटनंतर तो सलामी देण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. कॉटरेल याने वेस्ट इंडिजसाठी २०१५ मध्ये वनडेत तर 2013-14 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.