IND vs NZ 2nd Test 2024 Day 2 Stump Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंड दुसऱ्या डावात 198/5, भारतावर आतापर्यंत 301 धावांची आघाडी
IND vs NZ 2nd Test Day 2: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात पाच विकेट गमावून 198 धावा केल्या आहे. यासह न्यूझीलंडने भारतावर 301 धावांची आघाडी घेतली आहे.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात पाच विकेट गमावून 198 धावा केल्या आहे. यासह न्यूझीलंडने भारतावर 301 धावांची आघाडी घेतली आहे.
टाॅम लॅथमची 86 धावांची सर्वाधिक खेळी
दुसऱ्या डावात फलंदाजासाठी आलेल्या न्यूझीलंडकडून कर्णधार टाॅम लॅथमने 86 धावांची सर्वाधिक खेळी खेळली. तर भारतीय गोलंदाजाकडून वॉशिंग्टन सुंदर चार विकेट घेतल्या आहे. त्यामुळे शनिवारचा तिसरा दिवस हा भारतीय संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd Test 2024: पुणे कसोटीत भारतावर पराभवाचा धोका, 7 वर्ष जुना रेकॉर्डची होणार पुनरावृत्ती?)
New Zealand have things under control for a huge series upset 👊
🔗 https://t.co/7RDE0aZROt | #INDvNZ pic.twitter.com/aq1KhD4F6n
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 25, 2024
भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गारद
त्याआधी, भारतीय संघ पहिल्या डावात 156 धावांवर गारद झाला. दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला काय खास सुरुवात करता आली नाही. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येकी 30-30 धाव केल्या. तर रवींद्र जडेजाने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 1 धावावर बाद झाला त्यानंतर भारतीय फलंदाजांनी विकेट फेकल्या. दुसरीकडे न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर सर्वाधिक सात विकेट घेतल्या.
पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या सात विकेट
तत्तपुर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 259 केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी चांगली कामगिरी केली. कॉनवेने 141 चेंडूंचा सामना करत 76 धावा केल्या. रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. मिचेल सँटनर 33 धावा करून बाद झाला. टॉम लॅथम 15 धावा करून बाहेर पडला. भारताकडून सुंदरने 7 आणि अश्विनने 3 विकेट घेतल्या.
(The above story first appeared on LatestLY on Oct 25, 2024 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

