Scotland Women vs Sri Lanka Women Warm-up Match Live Streaming: सहाव्या सराव सामन्यात स्कॉटलंड आणि श्रीलंका आमनेसामने; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? येथे घ्या जाणून
उभय संघांमधील हा सामना दुबईच्या आयसीसी अकादमी ग्राउंड क्रमांक 2 वर खेळवला जाणार आहे.
Scotland Women National Cricket Team vs Sri Lanka Women National Cricket Team ICC Womens T20 World Cup Warm-up Matches 2024: आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 चा सराव सामना स्कॉटलंड महिला संघ विरुद्ध श्रीलंका महिला संघ यांच्यात आज 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईच्या आयसीसी अकादमी ग्राउंड क्रमांक 2 वर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना खेळला आहे. ज्यामध्ये विजयाची नोंद झाली आहे. पाकिस्तानने स्कॉटलंडचा 8 गडी राखून पराभव केला. तर बांगलादेशने श्रीलंकेचा 33 धावांनी पराभव केला. विश्वचषकाच्या तयारीचा विचार करता दोन्ही संघांचे सराव सामने अत्यंत महत्त्वाचे असून त्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. (हेही वाचा:BAN-W vs PAK-W Warm-up Match Live Streaming: आज बांगलादेश आणि पाकिस्तान सातव्या सराव सामन्यासाठी भिडणार, थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? येथे जाणून घ्या)
स्कॉटलंड विरुद्ध श्रीलंका महिला संघातील सातवा सराव सामना कधी खेळला जाणार?
स्कॉटलंड महिला संघ विरुद्ध श्रीलंका महिला संघ यांच्यातील सातवा सराव सामना आज सोमवारी 30 सप्टेंबर रोजी आयसीसी अकादमी ग्राउंड क्रमांक 2 वर खेळवला जाणार आहे. दुबई येथे संध्याकाळी 07:30 वाजता सामना खेळवला जाईल.
थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
सराव सामन्यांच्या प्रसारणाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, मॅच अपडेट्ससाठी, क्रीकेट प्रेमी आयसीसी मॅच पोर्टलद्वारे थेट स्कोअर पाहू शकतात.
दोन्ही संघांचे खेळाडू
स्कॉटलंड संघ: कॅथरीन ब्राइस (C), सारा ब्राइस (WK), लोर्ना जॅक-ब्राउन, ॲबे एटकेन-ड्रमंड, अबटा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लो एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅककॉल, डार्से कार्टर, आयल्सा लिस्टर, हन्ना रेनी, रेचेल स्ला , कॅथरीन फ्रेझर, ऑलिव्हिया बेल
श्रीलंका संघ: चमारी अथापथु(C), अनुष्का संजीवनी (WK), हर्षिता माधवी, नीलाक्षीका डी सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूरिया, सुगंधी कुमारी, सुगंधी कुमारी, सुगंधिका प्रबोधनी. कांचना.