विराट कोहली कर्णधारपदी कायम, सुनील गावस्कर यांच्या मतांबद्दल संजय मांजरेकर यांनी दर्शवली असहमती, वाचा सविस्तर
भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे का दिले, असा सवाल केला आहे. पण भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे गावस्कर यांच्या मतांशी असहमत आहे.
भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavasjar) यांनी नुकतेच संपुष्टात आलेल्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून मिळालेल्या पराभवानंतर संघ व्यवस्थापनेवर टीका केली होती. यानंतर गावसकर यांनी संघाचे नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) कडे का दिले, असा सवाल केला आहे. गावस्कर यांनी आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी निवड समितीने कोणतीही चर्चा न करता कोहलीचीच कर्णधारपदी फेरनियुक्ती केल्याचा आरोप केला आहे. मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्रात गावसकर यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले की, "निवड समितीने जर विंडीज दौऱ्यासाठी कर्णधार निवडताना बैठक बोलावली नसली तर ही गोष्ट गंभीर आहे. याचा अर्थ कोहली स्वत:ला हवा म्हणून कर्णधारपदावर कायम आहे किंवा निवड समिती खुश आहे", अशी टीका केली आहे. तसेच गावसकर यांनी म्हणाले की कोहलीची नियुक्ती विश्वचषसाठी करण्यात आली होती. यानंतर निवड समितीने बैठक बोलवणे गरजेचे होते. ही गोष्ट वेगळी की, बैठका या केवळ पाच मिनिटे चालतात तरी, कर्णधारपदासाठी निवड समितीने बैठक बोलावणे अपेक्षित होते. (IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान रोहित शर्मा, विराट कोहली यांना हे 3 रेकॉर्ड मोडण्याची संधी)
पण भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) हे गावस्कर यांच्या मतांशी असहमत आहे. विराटच्या नेतृत्वावर गावस्कर यांच्या मतांशी असहमती दाखवत मांजरेकर यांनी लिहिले की, "गावस्कर यांच्या मताशी मी सहमत नाही. भारताने वर्ल्ड कपमध्ये केलेली कामगिरी खराब नव्हती. 7 सामने जिंकले आणि फक्त दोन सामन्यात पराभव झाला. शेवटच्या सामन्यात निसटता पराभव झाला. निवडकर्त्यांमध्ये पदापेक्षा गुण महत्त्वाचे असतात." मांजरेकरांच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटवर नेटिझन्सनी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांचा उल्लेख करत हास्यास्पद कमेंट्स केल्या आहेत.
महोदय, संजय जी आणि सनी जी यांच्यातील प्रकरण सोडवण्यासाठी कुस्ती सामना कसा असेल? रेफरी नक्कीच रवींद्र जडेजा असतील...
भाव जडेजाच्या ट्वीट नंतर मुद्दाम हे ट्वीट केले ना? रोहितने सांगितले ना?
कोण कोणाशी सहमत नाही हे पहा.
विश्वचषक दरम्यान, मांजरेकर अनेक कारणांसाठी चर्चेत राहिले होते. अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्यावरील टीका आणि त्यांची कॉमेंट्री यासाठी सोशल मीडियावर मांजरेकर यांच्यावर कसून टीका करण्यात आली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)