#DhoniRetires पुन्हा ट्विटरवर ट्रेंड झाल्याने भडकली साक्षी धोनी; अफवा पसरवणाऱ्यांची केली बोलती बंद, ट्वीट नंतर केले डिलीट
बुधवारी त्याच्या निवृत्तीबाबत #DhoniRetires अचानक सोशल मीडिया ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला. त्याची पत्नी साक्षी धोनीनेही चर्चेत उडी घेतली असून धोनीच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीबद्दल बनावट बातम्या पसरवणाऱ्यांची बोलती बंद केली.
भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) तब्बल 11 महिन्यांपासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. यावेळी धोनीच्या निवृत्तीबाबतही बर्यापैकी अटकळ बांधली जात आहे. बुधवारी त्याच्या निवृत्तीबाबत #DhoniRetires अचानक सोशल मीडिया ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला. माहीच्या चाहत्यांनी त्याचे जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास सुरवात केली. धोनीच्या निवृत्तीबाबतचा गोंधळ काही केल्या संपेना. आणि आता त्याची पत्नी साक्षी धोनीनेही (Sakshi Dhoni) चर्चेत उडी घेतली असून धोनीच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीबद्दल बनावट बातम्या पसरवणाऱ्यांची बोलती बंद केली. धोनी वर्ल्ड कप 2019 सेमीफायनल सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. या दरम्यान, अनेकदा त्याच्या निवृत्तीचे वृत्त समोर आले, पण यावर बोर्ड किंवा खुद्द धोनीने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. बुधवारी #DhoniRetires ट्विटरवर ट्रेंड होऊ लागल्याने धोनीची पत्नी साक्षीने चालू असलेल्या अफवांबद्दल भूमिका घेण्याचे ठरविले आणि तीव्र प्रतिक्रिया दिली. (बेन स्टोक्सने एमएस धोनी याच्या खेळाडूवृत्तीवर केला प्रश्न, टीम इंडियाच्या 2019 वर्ल्ड कप पराभवाचे 'या' 3 खेळाडूंवर फोडले खापर)
धोनीची पत्नी साक्षीने धोनीच्या निवृत्तीबद्दल सर्व बनावट बातम्यांवर योग्य उत्तर दिले आणि स्वतः स्थिती स्पष्ट केली. ट्रेंडिंग हॅशटॅगने चकित झालेल्या साक्षीने ट्विटरवर जाऊन लिहिले, “फक्त अफवा! लॉकडाउनने लोकांना मानसिकरित्या अस्थिर केले हे मला समजले आहे!" साक्षीने हे सर्व अफवा म्हणून ट्विट केले मात्र, नंतर साक्षीने तिचे ट्वीट डिलीट केले. पाहा साक्षीच्या ट्विटचा स्क्रीनशॉट:
गेल्या वर्षी जुलै महिन्यात आयसीसी वनडे वर्ल्ड कप अंतर्गत न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये 38 वर्षीय धोनीने शेवटचा सामना खेळला होता. यानंतर ब्रेकमुळे धोनी टीम इंडियापासून दूर आहे. वर्ल्ड कप सामन्यात धोनीच्या हळू फलंदाजीवरही कडक टीका करण्यात आली होती. धोनीने 90 कसोटी, 350 वनडे आणि 98आंतरराष्ट्रीयटी-20 सामने खेळले आहेत. त्याने 200 वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नेतृत्व केले ज्यापैकी 110 सामने जिंकले गेले आणि 74 पराभूत झाले. तो भारताकडून सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारा क्रिकेटपटू आहे.