ICC Cricket World Cup 2019: वर्ल्डकप 2019 च्या धूममध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचीही वर्णी
या वर्ल्डकपच्या धूममध्ये मास्टर बास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) देखील सहभागी होणार आहे.
आजपासून आईसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 (ICC Cricket World Cup 2019) ला सुरुवात होईल. यंदा या विश्वचषक स्पर्धेसाठी 10 संघ सहभागी झाले आहेत. या वर्ल्डकपच्या धूममध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) देखील वर्णी लावणार आहे. इंग्लंडमधील वर्ल्डकप मध्ये सचिन कॉमेंट्री करताना दिसेल. आज वर्ल्डकपमधील दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड या पहिल्या सामन्यात सचिन तेंडूलकर 1.30 वाजता हिंदी आणि इंग्रजीत होणाऱ्या प्री शो मध्ये सहभागी होईल.
वर्ल्डकपमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी सचिन तेंडूलकर हा एक आहे. 2003 च्या वर्ल्डकपमध्ये सचिनने सर्वाधिक 673 रन्स केले होते. तसंच 2011 साली भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात सचिन तेंडूलकरने महत्त्वाची भूमिका निभावली होती. आतापर्यंत सचिन भारतासाठी 1992, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 च्या वर्ल्डकपमध्ये खेळला आहे.
आजपासून आयसीसी वर्ल्डकप 2019 चा शुभारंभ होणार असून काल (बुधवार, 29 मे) रोजी लंडनच्या बर्मिघम पॅलेस परिसरातील प्रतिष्ठीत लंडन मॉलमध्ये वर्ल्डकपच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. इंग्लंडची महाराणी एलिजाबेथ (Queen Elizabeth) यांची भेट
सर्व सहभागी संघांनी घेतली असून त्यांच्यासोबत फोटोजही काढले.
भारतीय कर्णधार विराट कोहली याने सांगितले की, "येथे येऊन फार आनंद झाला. येथे आमचे खूप चाहते आहेत. ही अभिमानाची आणि जबाबदारीची बाब आहे. आम्ही येथे मिळणारा पाठिंबा, प्रेम नक्कीच सद्कारणी लावण्याचा प्रयत्न करु."
फोटोज:
तर इंग्लंडचा कर्णधार इयोग मोर्गन याने सांगितले की, "आम्ही उद्याच्या सामन्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. उद्याचा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही जिथे आहोत तेथे येणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे."