सचिन तेंडुलकर यांनी ऑस्ट्रेलियन Spartan Sports फर्मवर ठोकला 14 कोटींचा दावा, पाहा काय आहे प्रकरण

स्पार्टन या कंपनीने 2016 मध्ये आपले नाव, लोगो, कपडे विकण्यासाठी तसेच, त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांची प्रतिमा वापरल्याबद्दल कंपनीने भरपाई मागणी म्हणून रॉयल्टीच्या रुपात एक मिलियन डॉलर (सुमारे सात कोटी रुपये) देण्याची तयारी दर्शवली होती.

File Image | Sachin Tendulkar (Photo Credits: PTI)

भारताचे माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांनी क्रिकेट बॅट निर्मिती करणाऱ्या एका ऑस्ट्रेलियन कंपनीवर (Australian Bat Manufacturer) दावा ठोकत रॉयल्टीच्या रुपात तब्बल 14 कोटी रुपयांची मागणी केली आहे. आपल्या दाव्यात सचिन तेंडुलकर यांनी आरोप केला आहे की, क्रिकेट बॅन निर्माती ही ऑस्ट्रेलियन कंपनी आपल्या उत्पादनाचा व्यावसायिक प्रसार करण्यासाठी आपल्या (सचिन तेंडुलकर) प्रतिमेचा वापर करते. आपल्या मान्यतेशिवाय प्रतिमा वापर केल्याचा ठपका ठेवत सचिन यांनी या कंपनीकडे रॉयल्टीच्या रुपात 2 मिलियन डॉलर (भारतीय चलनात तब्बल 14 कोटी रुपये) मागितले आहेत.

फेडरल कोर्टाकडे कायदेशीर कागदपत्रं सादर करत सचिन तेंडुलकर यांनी सिडनी स्थित स्पार्टन (SPARTAN) स्पोर्ट्स इंटरनॅशनल कंपनीवर दावा ठोकला आहे. दरम्यान, या कंपनीने 2016 मध्ये आपले नाव, लोगो, कपडे विकण्यासाठी तसेच, त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांची प्रतिमा वापरल्याबद्दल कंपनीने भरपाई मागणी म्हणून रॉयल्टीच्या रुपात एक मिलियन डॉलर (सुमारे सात कोटी रुपये) देण्याची तयारी दर्शवली होती.

दरम्यान, वृत्तसंस्था रॉयटर्सने कागदपत्रांच्या उल्लेखासह प्रसिद्ध केलेल्या वृत्तात दावा केला आहे की, सन 2016 मध्ये सचिन तेंडुलकर आणि स्पार्टन कंपनी याच्यात एक समझोता झाला होता. त्यानुसार कंपनीच्या उत्पादनावर सचिन तेंडुलकर यांची प्रतिमा आणि लोगो वापरण्याच्याबदल्यात कंपनीने सचिन तेंडूलकर यांना 10 लाख डॉलर (सुमारे 7 कोटी रुपये ) देणे कबूल केले होते. या करारानुसार स्पार्टन कंपनी ‘सचिन बाई स्पार्टन’ अशी टॅगलाईनसुद्धा वापरु शकणार होता.

सचिन हे स्पार्टन कंपनीच्या उत्पादनांच्या प्रचारासाठी लंडन आणि मुंबई येथे झालेल्या प्रमोशन इव्हेंटमध्येही सहभागी झाले होते. दरम्यान, सप्टेंबर 2018 पर्यंत स्पार्टन कंपनीने सचिन यांना एकदाही ठरलेल्या रकमेचा मोबदला दिला नाही. त्यानंतर सचिन यांनी कंपनीकडे आपल्या थकलेल्या मोबदल्याबद्दल विचारणा केली. मात्र त्याला काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे सचिन यांनी हा करार संपुष्टा आणला. तसेच, कंपनीने आपल्याशी संबंधीत कोणताच लोगो, प्रतिमा, पंचलाईन वापरु नये असे सांगितले. परंतू, स्पार्टन कंपनीने सचिनच्या प्रतिमेचा वापर कायम ठेवला. (हेही वाचा, Forbes 2019 Highest Paid Athlete: मेस्सी अव्वल स्थानी, विराट कोहली 100 व्या क्रमांकावर; सेरेना विल्यम्स यादीत एकमेव महिला)

दरम्यान, वृत्तसंस्थेने या प्रकरणाबाबत स्पार्टन कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) यांना प्रश्न विचारले. मात्र, या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. सचिनच्या वतीने हे प्रकरण पाहणारी लॉ फर्म गिल्बर्ट अॅण्ड टोबिन यांनीही याबाबत बोलण्यास नकार दिल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.