सचिन तेंडुलकर याने ड्रायव्हरलेस कारचा लुटला आनंद, प्रात्यक्षिक दाखवत Video केला शेअर
सचिनने शुक्रवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यात सचिन ड्राइव्हरलेस कारच्या पुढच्या सीटवर बसलेला दिसतोय.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ड्रायव्हरलेस कारमध्ये प्रवास केला. नाही याचा अर्थ असा होत नाही की सचिनने स्वतःहून कार ड्राइव्ह केली. पण असे झाले की मास्टर ब्लास्टर ड्रायव्हर नसलेल्या कारमध्ये जात होता आणि ती कार स्वत: हून चालत होती. असेही नव्हते की मिस्टर इंडिया, अनिल कपूर, यांनी ही गाडी चालवली. पण सचिनने स्वत: या ड्रायव्हरलेस कारची वैशिष्ट्ये दाखविली. (दहशतवाद्यांना ठेंगा! हिजाब घालून काश्मिरी मुलींनी चौकार-षटकारांची आतषबाजी, पहा हे हटके Photo)
सचिनने शुक्रवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यात सचिन ड्राइव्हरलेस कारच्या पुढच्या सीटवर बसलेला दिसतोय. आणि आश्चर्याची बाब म्हणजे की ही गाडी स्वतःच याच्या वेगावर आणि हालचालींवर नियंत्रण ठेवत होती. सचिनने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो गॅरेजमध्ये आपली कार पार्क करण्याचा प्रयत्न करताना दिसू शकतो. तो समोरच्या सीटवर बसलेला आहे पण ड्रायव्हरची सीट रिक्त आहे. सचिनने म्हणाला की मिस्टर इंडियाने आपल्या कारचा ताबा घेतल्यासारखे वाटले. पहा हा रोमांचक व्हिडिओ:
हा व्हिडिओ शेअर करताना सचिनने कॅप्शन मध्ये आपला अनुभव व्यक्त केला. आणि म्हणाल की, "माझ्या गॅरेजमध्येच माझी गाडी पार्क होताना पाहण्याचा रोमांचकारी अनुभव. असे वाटले की मिस्टर इंडियाने नियंत्रण घेतले आहे! मला खात्री आहे की शनिवार व रविवारचा उर्वरित भाग देखील माझ्या मित्रांसोबत उत्साहवर्धक असेल. दरम्यान, आयसीसी क्रिकेट विश्वचषक दरम्यान या दिग्गज क्रिकेटपटूने नुकतेच भाष्य केले. तो भारताच्या सर्व सामन्या दरम्यानदेखील कॉमेंट्री बॉक्समध्ये होता. आणि आता मीडिया रिपोर्ट्सनुसार भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान देखील सचिन भाष्यकार म्हणून उपस्थित राहणार आहेत.