पंतप्रधान मोदींच्या Fit India Moment समर्थनार्थ सचिन तेंडुलकर याने शेअर केला 'हा' खास व्हिडिओ

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ पोस्ट करताना सचिनने कॅप्शन देत सचिनने मोदींच्या फिट इंडिया मुव्हमेंटचे समर्थन केले.

सचिन तेंडुलकर (Photo Credit: Sachin Tenulkar/Instagram)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी राजधानी दिल्लीत ‘फिट इंडिया’ (Fit India) अभियान सुरू केले. क्रीडा दिनानिमित्त हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेची सुरूवात केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमात म्हणाले की, या दिवशी आम्हाला मेजर ध्यानचंद या नात्याने महान खेळाडू मिळाला, आज देश त्याच्यापुढे नतमस्तक आहे. फिट इंडियाच्या माध्यमातून निरोगी भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. पंतप्रधान म्हणाले की न्यू इंडियामध्ये प्रत्येक नागरिकाला तंदुरुस्त करणे हे सरकारचे लक्ष्य आहे. या मोहिमेअंतर्गत, प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठास 15 दिवसांची फिटनेस योजना तयार करावी लागेल आणि ती त्यांना महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या पोर्टल, वेबसाइटवर अपलोड करावी लागेल. प्रधानमंत्री मोदींच्या या अभियानाला क्रीडाविश्वातिल अनेक खेळाडूंकडून सहयोग मिळत आहे. (National Sports Day 2019: 'राष्ट्रीय क्रीडा दिना' निमित्त जाणून घ्या 'Hockey Wizard' मेजर ध्यानचंद आणि जर्मन हुकूमशहा हिटलर यांच्यातील मजेदार किस्सा)

नुकतेच, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सचिन एका वृद्धाश्रमाला भेट देताना दिसला. व्हिडिओ पोस्ट करताना सचिनने कॅप्शन देत लिहिले की, "सेंट अँथनीच्या वृद्धाश्रमात या आश्चर्यचकित महिलांबरोबर काही काळ घालवला, त्यांच्याद्वारे दाखवलेल्या प्रेमामुळे धन्य वाटले. कॅरम खेळण्याच्या त्यांच्या उत्साहाला काहीच मर्यादा नव्हती. जसे आमचे मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी सांगितले, खेळ आणि योग्यता सर्वांसाठी आहे."

दरम्यान, भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरी कोम हिनेदेखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फिट इंडियाशी निगडित एक व्हिडिओ शेअर केला. यात मेरी एका बीचजवळ बॉक्सिंगचा सराव करताना दिसतेय. नुकताच फिट इंडिया मुमेंटबाबत सरकारला सल्ला देण्यासाठी एक समिती गठित केली गेली. या समितीत इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए), नॅशनल स्पोर्ट्स असोसिएशन (एनएसएफ), सरकारी अधिकारी, खासगी संस्था आणि नाममात्र फिटनेस व्यक्तींचा समावेश होता.