Sachin Tendulkar Enjoys Mumbai Rains: मुंबईच्या पावसात भिजताना सचिन तेंडूलकर झाला Nostalgic; मुलगी सारा तेंडूलकरने कॅमेरामध्ये कैद केल्या भावना (Watch Video)

मात्र पावसाळ्यात असे अनेक क्षण येतात जे तुमच्या ओठावर नकळत हसू आणि आनंदाचे भारलेल्या आठवणी देऊन जातात. अशीच अवस्था झाली आहे क्रिकेट विश्वातील देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar).

Sachin Tendulkar (Photo Credits: Twitter)

मुंबईमधील पाऊस (Mumbai Rains)... पावसामधील मुंबईच्या होणाऱ्या अवस्थेबद्दल नेहमीच लोक तक्रार करत असतात. मात्र पावसाळ्यात असे अनेक क्षण येतात जे तुमच्या ओठावर नकळत हसू आणि आनंदाचे भारलेल्या आठवणी देऊन जातात. अशीच अवस्था झाली आहे क्रिकेट विश्वातील देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar). सचिन जसा त्याच्या मैदानातील फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो एक फॅमिली मॅन म्हणूनही ओळखला जातो. नुकतेच सचिनने त्याची मुलगी सारा तेंडुलकरने शूट केलेला एका व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सचिन मुंबईमधील पावसाचा मनोसोक्त आनंद घेताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सतत पावसाच्या सरी कोसळत आहेत. सध्या लॉक डाऊनमुळे बाहेर जाता येत नसले तरी, प्रत्येक जणच घरात बसून या पावसाचा आनंद घेत आहे. अशावेळी सचिन तेंडुलकरलाही पावसात भिजायचा मोह झाला व त्याने आपली ही इच्छा पूर्ण केली. सचिनचे हे पावसात भिजणे त्याच्या मुलीने कॅमेरामध्ये कैद केले आहे.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

My favourite camerawoman 📸, @saratendulkar captured me enjoying the simpler joys of life! Raindrops always bring back my childhood memories. #mumbairains

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

हा व्हिडिओ शेअर करताना सचिन लिहितो, ‘माझ्या आवडत्या कॅमेरावुमन सारा तेंडुलकरने, जीवनातील साधा आनंद एन्जॉय करताना मला कॅमेरामध्ये कैद केले. पावसाच्या या सरी नेहमीच माझ्या लहानपणीच्या आठवणी परत आणतात.’ अशा प्रकारे सचिनने या पावसात भिजण्याच्या आपल्या भावना मांडल्या आहेत. (हेही वाचा: सौरव गांगुली की एमएस धोनी? गांगुलीवर मात करत वर्ल्ड कप विजेता धोनी ठरला भारताचा महान कर्णधार)

या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की पूर्णतः काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये सचिन आपल्या घरात पावसात भिजत आहे. आकाशातून पावसाच्या रिमझिम धारा कोसळत आहेत आणि सचिन त्याचा आनंद घेत आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून लॉक डाऊनमुळे सर्वजण घरातच आहेत. अशावेळी पावसात भिजण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते, मात्र सध्या तरी पावसाचा आनंद आपल्याला घरात बसूनच घ्यावा लागणार आहे. याआधी सचिनने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो आपला मुलगा अर्जुनचे केस कापताना दिसत आहे.