Sachin Tendulkar Corona Positive: सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण, घरीच होम क्वारंटाइन राहणार
सचिन याने स्वत: याने ट्विट करत माहिती दिली आहे. तर सचिन तेंडुलकर याच्या परिवारातील अन्य जणांचे कोरोनाचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत.
Sachin Tendulkar Corona Positive: देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. सचिन याने स्वत: याने ट्विट करत माहिती दिली आहे. तर सचिन तेंडुलकर याच्या परिवारातील अन्य जणांचे कोरोनाचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत.(IND vs ENG 3rd ODI 2021: ‘करो या मरो’च्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघातून होऊ शकते या गोलंदाजांची सुट्टी, पहा टीम इंडियाचा संभावित Playing XI)
कोरोनाची लागण झाल्याने सचिन तेंडुलकर याने असे म्हटले आहे की, कोरोनाची हलकी लक्षणे आढळून आल्याने त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वत:ला होम क्वारंटाइन केल्याचे सचिन याने ट्विट करत म्हटले आहे. या व्यतिरिक्त कोरोनाच्या महासंकटासंबंधित सर्व महत्वाच्या प्रोटोकॉलचे पालन करत असून सर्व हेल्थकेअर प्रोफेशनल्सचे आभार त्याने मानले आहेत.(IND vs ENG 2nd ODI 2021: जॉनी बेअरस्टोने मोडला ‘विराट’ रेकॉर्ड, कुलदीप यादव ठरला महागडा, दुसऱ्या वनडे सामन्यात पडला विक्रमांचा पाऊस)
Tweet:
दरम्यान, तेंडुलकर नुकताच सेफ्टी वर्ड सीरिज मध्ये इंडिया लीजेंड्ससाठी कर्णधार पद भुषवत होता. ज्यामध्ये भारताने श्रीलंकेला फायनलमध्ये मात देत पुरस्कार आपल्या नावावर केला होता. हे सर्व सामने रायुपर मध्ये झाले होते.